![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/1-62725491.jpg?width=380&height=214)
SC On Ranveer Allahbadia: 'इंडियाज गॉट लेटेंट' या रिअॅलिटी शोमध्ये एका अश्लील विनोदाबद्दल युट्यूबर रणवीर अलाहबादिया (Ranveer Allahbadia) विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता रणवीर इलाहाबादिया यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अनेक एफआयआरविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. तसेच त्याने या प्रकरणावर त्वरित सुनावणी करण्याची विनंती केली आहे. तथापि, इलाबादियाला आता न्यायालयाकडून झटका बसला आहे. न्यायालयाने या खटल्याची तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे.
रणवीर इलाहाबादियाने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. यासोबतच, रणवीरने वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या सर्व एफआयआर एकत्र करण्याची मागणीही केली आहे. अलाहाबादिया यांच्या वतीने वकील अभिनव चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडून लवकर सुनावणीची मागणी केली. तथापि, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी सध्या तारीख देण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने रणवीरचे वकील अभिनव चंद्रचूड यांना सांगितले की, ते लवकर सुनावणीच्या तोंडी मागणीचा विचार करणार नाहीत. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी अलाहाबादिया यांच्या वकिलाला प्रथम रजिस्ट्रीशी संपर्क साधण्यास सांगितले. (हेही वाचा -Rajpal Yadav on Ranveer Allahbadia : रणवीर अलाबादियाच्या वादग्रस्त विधानावर राजपाल यादव संतापला; म्हणाला, ‘आई-वडीलांनाही नाहीत सोडत’ (Watch Video))
समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये अपशब्द वापरल्यामुळे अडचणीत आलेल्या रणवीर इलाहाबादियाला पोलिसांनी दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. रणवीरला गुरुवारी त्याचा जबाब नोंदवायचा होते. परंतु तो पोलिस स्टेशनला पोहोचला नाही. त्यामुळे आता त्याला आज पुन्हा हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आले आहे. रणवीरला खार पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, 'इंडियाज गॉट लेटेंट' या यूट्यूब शोमध्ये इलाहाबादिया यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा सायबर सेल आणि मुंबई पोलिस स्वतंत्रपणे तपास करत आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, रैना अमेरिकेत आहे आणि त्याने तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी अधिक वेळ मागितला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलिसांनी रैनाला 17 फेब्रुवारीपूर्वी त्याचा जबाब नोंदवण्यास सांगितले आहे, तर सायबर सेलने त्याला 18 फेब्रुवारी रोजी समन्स बजावले आहे.
महिला आयोगाची नोटीस -
राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) रणवीर, समय रैना आणि इतर पॅनेल सदस्य मुखिजा, जसप्रीत सिंग आणि आशिष चंचलानी तसेच शोचे निर्माते तुषार पुजारी आणि सौरभ बोथरा यांना 17 फेब्रुवारी रोजी दिल्लीत हजर राहण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने इलाहाबादिया आणि 'इंडियाज गॉट लेटेंट' कॉमेडियन रैनासह 40 हून अधिक लोकांना समन्स बजावले आहेत.