Ranbir Kapoor and Alia Bhatt's Wedding (संग्रहित संपादित प्रतिमा)

गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या (Ranbir Kapoor and Alia Bhatt's Wedding) चर्चा आहेत. मंगळवारपासून या दोघांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. आज, 13 एप्रिल रोजी पाली हिल येथील वास्तू अपार्टमेंटमध्ये रणबीर-आलियाचा मेहंदी सोहळा पार पडला. आता दोघांच्या लग्नाची तारीखही जाहीर झाली आहे. रणबीरची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा यांनी घराबाहेर पापाराझींसोबत संवाद साधताना सांगितले की, रणबीर-आलियाचे लग्न उद्या म्हणजेच 14 एप्रिल रोजी 'वास्तू अपार्टमेंट'मध्येच होणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, आज रात्री या जोडप्याचा संगीत सोहळा होऊ शकतो. वास्तू अपार्टमेंटमध्येच संगीत सोहळा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संगीतानंतर सकाळी 9 वाजता हळदी समारंभ, त्यानंतर चुडा समारंभ, कुलदेवतेची पूजा आणि त्यानंतर संध्याकाळी रणबीर-आलिया पंजाबी रितीरिवाजांनुसार लग्नगाठ बांधतील. वृत्तानुसार, उद्या रणबीर कपूरची वरात निघेल, जी कृष्णा राज बंगल्यामार्गे वास्तू अपार्टमेंटमध्ये पोहोचेल. त्यासाठी दोन्ही घरांच्या मधोमधचा रस्ता झाडांवर दिवे लावून सजवण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मेहेंदी सेरेमनीमध्ये रणबीरची आई नीतू कपूर, रीमा जैन, बहीण रिद्धिमा, आलियाचे वडील महेश भट्ट, बहीण पूजा-शाहीन आणि भाऊ राहुल उपस्थित होते. याशिवाय करीना कपूर खान, करिश्मा कपूर, अरमान जैन, करण जोहर, अनुष्का रंजन, श्वेता बच्चन, निखिल नंदा आणि अयान मुखर्जी यांच्यासह काही इतर सेलिब्रिटींनीही मेहंदी सोहळ्याला हजेरी लावली होती.

मेहंदी समारंभाच्या आधी दुपारी 2 वाजता रणबीरच्या घरी 'वास्तू अपार्टमेंट'मध्ये दिवंगत ऋषी कपूर आणि सर्व पूर्वजांच्या स्मरणार्थ पितृपूजा झाली, ज्यामध्ये दोघांच्याही कुटुंबीयांनी हजेरी लावली. त्यानंतर गणेश पूजन करण्यात आले.