Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या वृत्तांवर पडदा; Randhir Kapoor यांनी दिली 'ही' माहिती
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Photo Credits: Twitter

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहे. दोघांच्या लग्नाशी संबंधित काहीना काही बातम्या सोशल मीडियावर दररोज ट्रेंड करत असतात. नुकतेच काही अहवालांमध्ये दावा करण्यात आला होता की, रणबीर आणि आलिया एप्रिल महिन्यात लग्न करणार आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये हे लग्न होईल असेही अनेक अहवालांमध्ये नमूद केले होते. मात्र यामध्ये कितपत सत्य आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या लग्नाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. रणबीरचे कुटुंबीय या वृत्ताचे खंडन करत आहेत. आता रणबीर आणि आलियाच्या लग्नावर रणधीर कपूर यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. रणधीर कपूर यांना रणबीर आणि आलियाच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी या वृत्ताचे खंडन केले. याआधी रिमा जैन यांनीही एका मुलाखतीत लग्नाची बातमी फेटाळून लावली होती.

हिंदुस्तान टाईम्सशी खास बातचीत करताना रणधीर कपूर म्हणाले की, ‘सध्या मी मुंबईत नाही परंतु या लग्नाबाबत मी काहीही ऐकले नाही. जर आमच्या घरी लग्नासारखी मोठी गोष्ट घडत असती तर मला नक्कीच याबाबत माहिती दिली असती. सध्या तरी अशी काहीही माहिती मला नाही.’ नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूरला त्याच्या लग्नाची तारीख विचारण्यात आली होती. त्यावर तो म्हणाला की होता की, ‘मला काय वेड्या कुत्र्याने चावा घेतला आहे का की मी तुम्हाला माझ्या लग्नाची तारीख सांगू.’ (हेही वाचा: Kaun Banega Crorepati 14 Promo: अमिताभ बच्चन पुन्हा येणार 'हॉट सीट'वर, जाणून घ्या कोणत्या दिवसापासून होणार रजिस्ट्रेशन)

दरम्यान, आलिया आणि रणबीर 2018 साली चित्रपटाच्या सेटवर एकमेकांना भेटले होते आणि तेव्हापासून त्यांच्या नात्याला सुरुवात झाली. सोनम कपूरच्या रिसेप्शनमध्ये रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच एकत्र दिसले. दोघेही लवकरच ब्रह्मास्त्रमध्ये एकत्र दिसणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग संपले आहे. या चित्रपटात रणबीर आणि आलियासोबत अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन देखील दिसणार आहेत.