अभिनेता राजकुमार राव याचा चित्रपट 'तुर्रम खान' चे टायटल बदलले; आता 'हे' असेल नवीन नाव
Rajkummar Rao Film Turram Khan (PC- Instagram)

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao)आणि अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrat Bharucha) यांचा चित्रपट 'तुर्रम खान'चे (Turram Khan )टायटल बदलले आहे. मेकर्सने या चित्रपटाचे नाव 'छलांग' (Chhalaang) करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट 31 जानेवारी 2020 ला रिलीज होणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असलेली अभिनेत्री नुसरतने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. या चित्रपटाचा निर्माता अजय देवगण असून हंसल मेहताने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात मोहम्मद जीशान अय्यूबही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

2010 मध्ये राजकुमार राव आणि नुसरत भरूचा 'लव्ह सेक्स और धोखा' या चित्रपटात एकत्र दिसले होते. आता ते 'छलांग' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी राजकुमार आणि नुसरत अतिशय उत्साही आहेत. हा चित्रपट उत्तर प्रदेशच्या छोट्याशा शहराची कहाणी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मात्याने सामाजिक मुद्द्यावर भाष्य केले आहे. (हेही वाचा - वय वर्ष 60 असणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता यांचा 'फ्रॉक का शॉक' बोल्ड फोटो व्हायरल)

राजकुमार राव हा बॉलिवूडमधील सर्व निर्मात्यांचा आवडता अभिनेता झाला आहे. त्याच्या उत्तम अभिनयामुळे त्याला एकामागे एक सिनेमे मिळत आहेत. 'मेंटल है क्‍या', 'मेड इन चाइना', 'इमली', 'तुर्रम खान' और 'रूह-अफजा' या सिनेमांमध्ये राजकुमार मुख्य भूमिका आहे.