वय वर्ष 60 असणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता यांचा 'फ्रॉक का शॉक' बोल्ड फोटो व्हायरल
Bollywood actress Nina Gupta (PC- Instagram)

वय वर्ष 60 असणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता (Bollywood Actress Nina Gupta) यांचा फ्रॉकमधील बोल्ड फोटो (Bold Photo) व्हायरल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये नीना गुप्ता अतिशय बोल्ड दिसत आहेत. नीना गुप्ता यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी 'फ्रॉक का शॉक' (Frock Ka Shock) गजराज सरांनी काढलेला फोटो, अशी कॅप्शन दिली आहे.

नीना गुप्ता यांचे वय सध्या 60 वर्ष आहे. परंतु, तरीदेखील त्या या फोटोमध्ये अतिशय बोल्ड दिसत आहेत. त्यांच्या या फोटोला चाहत्यांनी लाईक तसेच कमेंट्स केल्या आहेत. (हेही वाचा - लग्नाअगोदरच आई होणारी अभिनेत्री कल्की कोचलिनने बेबी बंपसोबत केलं फोटोशूट; पाहा खास फोटो)

 

View this post on Instagram

 

Frock ka shock. Picture taken by the gajraj sir

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

 

View this post on Instagram

 

Laut ke buddhu ghar ko aaye 😛😛😛😛😛 👗: @houseofmasaba 💎: @birdhichand

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

नीना गुप्ता नेहमीच आपल्या बोल्ड लुक आणि स्टेटमेंटमुळे चर्चेत असतात. आता त्यांच्या या बोल्ड फोटोमुळे पुन्हा त्या चर्चेत आल्या आहेत. या फोटोत नीनांनी पिवळ्या रंगाचा प्रिंटेड शॉर्ट ड्रेस घातलेला आहे. नीना गुप्ता यांनी छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरला सुरूवात केली आहे. त्यानंतर नीना यांनी 'नजदीकिया', 'मंडी', 'उत्सव', 'डॅडी', 'तेरे संग', 'दिल से दिया वचन', अशा अनेक चित्रपटांत महत्त्वाची भूमिका केली.

 

View this post on Instagram

 

@verveindia’s November-December ‘18 issue available on stands now!

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

 

View this post on Instagram

 

Missing Goa #flashbackmonday

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

नीना ज्याप्रमाणे बोल्ड दिसतात त्याचप्रमाणे त्यांचे विचारही बोल्ड आहेत. त्यांनी 80 च्या दशकात वेस्ट इंडियाचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत लग्न न करता त्याच्या मुलीला जन्म देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी जगाची पर्वा न करता परंपरेला छेद दिला होता.