Maha Kumbh 2025, Rajkummar Rao (Photo Credits: Instagram)

Maha Kumbh 2025: फेब्रुवारी 2025 मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्याला बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि त्यांची पत्नी पत्रलेखा उपस्थित होते. त्यांच्या आध्यात्मिक प्रवासादरम्यान, त्यांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले आणि परमार्थ निकेतन महाकुंभ शिबिरस्थळावर स्वामी चिदानंद सरस्वती महाराजांना भेटले. महाकुंभमेळ्यात आपली उपस्थिती दाखविणाऱ्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींमध्ये राजकुमार राव सामील झाला आहे. यावेळी त्यांनी पत्नी पत्रलेखा यांच्यासह धार्मिक विधींमध्ये भाग घेतला आणि संतांचे आशीर्वाद घेतले.

राजकुमार राव यांनी महाकुंभमेळ्याच्या अनुभवावर केले भाष्य

महाकुंभमेळ्यातील आपला अनुभव सांगताना राजकुमार राव एएनआयला म्हणाले, "येथील वातावरण खूप सकारात्मक आणि दिव्य आहे. शेवटच्या वेळी जेव्हा मी माझ्या पत्नीसोबत महाकुंभाला आलो होतो तेव्हा त्या अनुभवाने माझे आयुष्य बदलून टाकले." ते पुढे म्हणाले, "आम्ही स्वामीजींना पहिल्यांदाच ऋषिकेशमध्ये भेटलो आणि तेव्हापासून त्यांना नियमितपणे भेटत आहोत. आम्ही त्यांचे आशीर्वाद घेतले आणि नंतर संगमात स्नान केले. हा एक भव्य कार्यक्रम आहे आणि माझ्या शुभेच्छा सर्व भक्तांना आणि प्रशासनाला आहेत."

पाहा पोस्ट -

 

महाकुंभ मेळ्यात अनेक प्रसिद्ध व्यक्ती पोहोचल्या

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या आधी अनेक प्रसिद्ध व्यक्ती महाकुंभमेळ्यात सहभागी झाल्या आहेत. यामध्ये हेमा मालिनी, अनुपम खेर, भाग्यश्री, मिलिंद सोमण, कवी कुमार विश्वास, क्रिकेटपटू सुरेश रैना, कुस्तीगीर द ग्रेट खली, नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा आणि किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर ममता कुलकर्णी यांचा समावेश आहे.

चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, राजकुमार राव अलीकडेच 'विकी विद्या का व्हिडिओ' मध्ये दिसला. येत्या काळात तो सान्या मल्होत्रासोबत 'टोस्टर' चित्रपटात दिसणार आहे.