Radhe: सलमान खानला धक्का; IMDB वर राधेला मिळाले फक्त 1.9 रेटिंग, भाईजानच्या करियरमध्ये दुसऱ्यांदा सर्वात कमी Rating
Salman Khan's Radhe Movie Poster (Photo Credits: Instagram)

सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतीक्षित चित्रपट ‘राधेः युअर्स मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe: Your Most Wanted Bhai) ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. एकीकडे या चित्रपटाने सर्वाधिक व्ह्यूज मिळवले आहेत तर दुसरीकडे या चित्रपटाने प्रेक्षकांची घोर निराशा केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. या चित्रपटाला अतिशय खराव रिव्ह्यूज मिळाले असून, सलमानच्या करियरमधील सर्वात वाईट चित्रपटांपैकी एकात त्याची गणना केली जात आहे. आता सलमान खानच्या या चित्रपटाला आयएमडीबी (IMDB) वरही खूप कमी रेटिंग मिळाले आहे. राधेला आयएमडीबीवर फक्त 1.9 रेटिंग मिळाले आहे.

प्रेक्षकांनी चित्रपटाला किती पसंती दिली आणि तो चित्रपट हिट आहे की फ्लॉप, हे आयएमडीबीच्या रेटिंगवरून दिसून येते. सुमारे 75 हजार दर्शकांनी राधे चित्रपट पाहिल्यानंतर या चित्रपटाला 1.9 हे रेटिंग दिले आहे. यासह राधे हा सलमानच्या करियरमधील सर्वात कमी रेटिंगचा चित्रपट ठरला आहे. महत्वाचे म्हणजे सलमानच्या रेस 3 या चित्रपटालाही 1.9 ची रेटिंग मिळाली आहे.

वॉन्टेडनंतर सलमानचे व्यावसायिक यश प्रचंड वाढले. सलामनच्या बजरंगी भाईजानला 8.0 रेटिंग होते. यानंतर सुलतान चित्रपटाचे रेटिंग 7.0 होते.

दबंग (2010) 6.2, वीर (2010) 4.5, रेडी (2011) 4.7, बॉडीगार्ड (2011) 4.6, एक था टाइगर (2012) 5.5, दबंग 2 (2012) 4.8, जय हो (2014) 5.1, किक (2014) 5.3, प्रेम रतन धन पायो (2015) 4.4, ट्यूबलाइट (2017) 3.9, टाइगर जिंदा है (2017) 5.9, रेस 3 (2018) 1.9, भारत (2019) 4.9, दबंग 3 (2019) 3.1, राधे (2021) 2.0 (हेही वाचा: Gangubai Kathiawadi च्या निर्मात्याला दररोज सहन करावे लागत आहे 3 लाख रुपयांचे नुकसान; काय आहे नेमकी या मागचं कारण, जाणून घ्या)

दरम्यान, प्रभू देवा दिग्दर्शित सलमान खानच्या या चित्रपटात दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ, रणदीप हूडा, गौतम गुलाटी यांच्यासह अन्य कलाकार आहेत. या चित्रपटाचे संगीत पसंत केले जात आहे. चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सीन्सचीही चर्चा होत आहे. मात्र चित्रपट मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.

दरम्यान, 2020 मध्ये रिलीज झालेला सडक 2 हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात वाईट रेटिंग मिळालेला चित्रपट आहे. त्याला फक्त 1.1 चे रेटिंग मिळाले आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही भारतातील सर्वात आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा नापसंत केलेला व्हिडिओ आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते.