Priyanka Chopra Jonas चा हेअरस्टाईलमधील नवा लूक पाहून चाहते झाले Flat; 15 लाखांहून अधिक लोकांनी केले पसंत
Priyanka Chopra New Look (Photo Credits: Instagram)

हॉलिवूडपर्यंत मजल मारणारी बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपड़ा जोनस (Priyanka Chopra Jonas) निक जोनसशी (Nick Jonas) लग्न झाल्यानंतर आपले विवाहित आयुष्य छान एन्जॉय करताना दिसत आहे. हा सुंदर काळ आणि निक जोनससोबत घालवलेले सुंदर क्षण ती सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेली प्रियंका आपले एकाहून एक हॉट आणि सेक्सी फोटोज देखील ती सोशल मिडियावर शेअर करत असते. नुकताच तिने आपल्या नव्या हेअरकट (Hair Cut) मधला लूक आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

या फोटोमध्ये ती आपल्या नव्या बाउन्सी हेअरकटला फ्लाँट करताना दिसत आहे. त्याचे तिचे गोड हास्य चाहत्यांवर मोहिनी घालणारेच आहे. प्रियंका चोपडाच्या शिरपेचात मानाचा तुरा; जगातील सर्वात यशस्वी आणि प्रेरणादायक 100 महिलांमध्ये समावेश

 

View this post on Instagram

 

New hair, don’t care.

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

या फोटोखाली तिने 'न्यू हेअर डोन्ट केयर' असे म्हटले आहे. प्रियंकाचा हा नवा लूक तिच्या चाहते देखील पसंत करत आहे. या न्यू हेअरकटचे कौतुक करत तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या फोटाला आतापर्यंत 15 लाखांहून अधिक लोकांनी पसंत केले आहे.

दरम्यान प्रियंकाच्या यशाच्या शिरेपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे. नुकतेच प्रियंका चोपडाच्या नावाचा समावेश, जगातील सर्वात यशस्वी आणि प्रेरणादायक 100 महिलांमध्ये झाला आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्म क्रिएट कल्टिव्हेटने (Create Cultivate 100) एक यादी जाहीर केली असून, त्यामध्ये प्रियंका चोपडा हिचे नाव मनोरंजन प्रकारातील पहिल्या 100 यशस्वी महिलांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.