प्रियंका चोपडा (Photo Credits : Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा (Priyanka Chopra Jonas) हिने बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत, यशाची अनेक शिखरे गाठली आहेत. म्हणूनच आज जगभरातील अनेक व्यासपीठावर तिला आदर दिला जातो. आता प्रियंकाच्या यशाच्या शिरेपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे. नुकतेच प्रियंका चोपडाच्या नावाचा समावेश, जगातील सर्वात यशस्वी आणि प्रेरणादायक 100 महिलांमध्ये झाला आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्म क्रिएट कल्टिव्हेटने (Create Cultivate 100) एक यादी जाहीर केली असून, त्यामध्ये प्रियंका चोपडा हिचे नाव मनोरंजन प्रकारातील पहिल्या 100 यशस्वी महिलांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

पहा प्रियंका चोपडा ट्वीट -

वेबसाइटमध्ये फॅशन, फूड, मनोरंजन, उद्योजकता, आरोग्य, कंटेंट, सौंदर्य, संगीत या क्षेत्रातील महिलांचा समावेश आहे. प्रियंका चोपडा हिचे नाव मनोरंजन प्रकारात समाविष्ट केले गेले आहे. भारतासाठी ही खचितच अभिमानाची गोष्ट आहे. या यादीमध्ये नाव समाविष्ट झाल्यांनतर प्रियंका चोपडाने सर्वांचे आभार मानले आहेत. प्रियंका चोपडाने एक ट्वीट केले आहे, ज्यामध्ये ती लिहिते, 'थँक्स यू क्रिएट अँड कल्टिवेट... ज्यांनी यावर्षीच्या करमणूक प्रकारातील क्रिएट कल्टिव्हेट 100 यादीमध्ये माझे नाव समाविष्ट केले.'

यासोबतच प्रियंका चोपडाने एक लिंक शेअर केली आहे ज्यात तिने आपल्या अनुभवाविषयी लिहिले आहे. अलीकडेच फोर्ब्सनेदेखील प्रियंका चोपडालाह टॉप-100 सेलेब्सच्या यादीमध्ये समाविष्ट केले होते. नुकतीच दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत, प्रियंका चोपडा देखील दिसली होती. यावेळी दीपिका पादुकोणला दावोसमध्येच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा प्रतिष्ठित 'क्रिस्टल पुरस्कार' देण्यात आला. (हेही वाचा: प्रियंका चोपडा हिला गुडविल एम्बेसडर पदावरुन हटवा; पाकिस्तानची UN कडे मागणी)

आतापर्यंतच्या कारकिर्दीचा अनुभव शेअर करताना प्रियंका म्हणते, 'जीवनांत प्रत्येक वेळी ताठ मानेने मी प्रत्येक पराभवाचा सामना केला, त्याला स्वीकारले. जेव्हा आपण ते करण्यास शिकतो, तेव्हा अपयश देखील आपल्याला घाबरते.'