प्रियंका चोपडा हिला गुडविल एम्बेसडर पदावरुन हटवा; पाकिस्तानची UN कडे मागणी
Priyanka Chopra | (Photo Credits: Instagram)

UNICEF च्या Goodwill Ambassador या पदावरुन अभिनेत्री प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) हिला हटविण्यात यावे अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. पाकिस्तानातील एक मंत्री (मानवाधिकार विभाग) शिरीन एम. मजारी (Shireen M Mazari) यांनी यूनिसेफच्या डायरेक्टर्सना एक पत्र लिहून ही मागणी केली आहे. मजारी यांनी हे पत्र सोशल मीडियातून प्रसिद्ध केले आहे. मजारी यांनी आपल्या पत्रात जम्मू कश्मीर राज्यातून 370 (Jammu and Kashmir Article 370) हटवल्याबद्दल, मोदी सरकारचे धोरण आणि भारतीय लष्करावर आरोप केले आहेत. तसेच, प्रियंका चोप्रा ही भारत सरकार आणि लष्कराने उचललेल्या पावलांचे समर्थन करते, त्यामुळे तिला या पदावरुन हटवावे असे म्हटले आहे.

प्रियंका चोपडा हिने नुकताच एका कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमात एक पाकिस्तानी कार्यकर्ता आयशा मलिक ही प्रियंका चोपडा हिने काही महिन्यांपूर्वी केलेल्या एका ट्विटवर संताप व्यक्त केला. या ट्विटमध्ये प्रियंका चोपडा हिने भारतीय लष्कराचे कौतुक केले होते. याच मुद्द्यावरुन शिरीन एम मजारी यांनी प्रियंका चोपडा हिला लक्ष्य केले आहे.

शिरीन माजरी यांनी यूनिसेफला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'मी आपले लक्ष प्रियंका चोपडा हिच्याकडे वेधू इच्छिते. जिला आपण शांततेसाठी यूएन गुडविल एम्बेसडर म्हणून नियुक्त केले आहे.' मजारी यांनी काश्मीरच्या मुद्द्याकडे निर्देश करत म्हटले आहे की, 'हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या सर्व आंतरराष्ट्रीय परिषदांच्या उल्लंघनांचा परिणाम आहे.' (हेही वाचा, जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटवणं हा भारताचा अंतर्गत विषय: बांग्लादेश च्या परराष्ट्र मंत्र्याचे विधान)

शिरीन एम मजारी-ट्विट

मजारी पुढे म्हणता, 'प्रियंकाने भारताच्या भूमिकेचे पूर्णपणे समर्थन केले आहे. तसेच, तिने भारतीय संरक्षण मंत्र्यांनी पाकिस्तानला दिलेल्या न्यूक्लियर धमकीचेही समर्थन केले आहे. तिचे हे वर्तन शांतता आणि गुडविल नितीच्या पूर्णपणे विरोधात आहे. त्यामुळे मी मागणी करु इच्छिते की, प्रियंका चोपडा हिला यूएनने तातडीने गुडविल एम्बेसडर पदावरुन हटवावे.'