जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटवणं हा भारताचा अंतर्गत विषय: बांग्लादेश च्या परराष्ट्र मंत्र्याचे विधान
शेख हसीना आणि पीएम मोदी (Photo Credits: Getty/PTI)

मोदी सरकारने जम्मू कश्मीरमधून कलम 370 आणि 35 A हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तानमधून अनेक राजकीय विधानं समोर आली आहेत. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन जगाचं लक्ष वेधण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी निष्कळ ठरला. आता भारताने कश्मीरमधून कलम 370 हटवणं हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं विधान बांग्लादेशच्या (Bangladesh) पराराष्ट्र मंत्र्याने केला आहे. देशातील शांती,स्थिरता आणि विकास ही प्रत्येक देशासाठी प्राथमिकता जपण्याचा आम्ही कायम प्रयत्न केला असल्याचं म्हटलं आहे.

बांग्लादेशने भारताच्या बाजूने विधान केल्याने हा पाकिस्तानसाठी मोठा झटका असल्याचे समजलं जात आहे. कालच पाकिस्तानने जम्मू कश्मीर प्रकरण आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत अशा आशयाचे विधान इमरान खान यांनी केल्याचे सांगितले आहे.

ANI Tweet 

जम्मू कश्मीरमधून 370 कलम भारताने हटवल्यानंतर पाकिस्तानने UNSC पत्र लिहून बंद खोलीत भारत पाक संबंधांवर चर्चा देखील केली मात्र तो प्रयत्न निष्फ़ळ ठरला.