Forbes मासिकाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या Top Ten यादीतून Priyanka Chopra, Deepika Padukone बाहेर
FotoJPriyanka Chopra, Scarlett Johansson, Deepika Padukone et | (Photo credit: Archived, edited, representative images)

फोर्ब्स (Forbes) मासिकाने जून 2018 ते जून 2019 या काळातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला अभिनेत्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या आदीतील टॉप टेन क्रमांकावर नजर टाकता भारतीय अभिनेत्री प्रियंका चोपडा (Priyanka Chopra)आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) बाहेर पडल्या आहेत. तर, हॉलीवुड एक्ट्रेस स्कारलेट जॉनसन (Scarlett johansson) ही अव्वल ठरली आहे. स्कारलेट जॉनसन हिची वार्षिक कमाई 400 कोटी इतकी असल्याचे पुढे आली आहे. तिची कमाई वाढण्यात चित्रपट ‘ब्लैक विडो’ मार्वल फिल्म्स आणि ‘एवेंजर्स: एंडगेम’ कारणीभुत ठरल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या यादीत एकाही भारतीय स्टार (Indian Star) समाविष्ठ नाही.

सन 2018 मध्ये 'पद्मावत' चित्रपटानंतर दीपिका पादुकोण हिचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. तर, प्रियंका चोपडा ही तर प्रदीर्घ काळापासून बॉलिवुडपासून दूर आहे. अलिकडेच तिने ए किड लाइक जैक आणि 'इंसेट इट रोमांटिक' नावाच्या हॉलीवुड फिल्म (Hollywood Films) मध्ये तिने काम केले आहे. (हेही वाचा, Forbes Rich List 2019: फोर्ब्स श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी 13 व्या स्थानावर; संपत्तीत इतक्या कोटींची वाढ)

दरम्यान, केवळ यंदाच नव्हे तर, गेल्या वर्षीही हॉलीवुड एक्ट्रेस स्कारलेट योहानसन हिने क्रमांक एकचे स्थान मिळवले होते. तिने 2018 मध्येही या यादीत पहिले स्थान मिळवले होते. तिच्या पाठोपाठ स्टार सोफिया वर्गारा ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी स्टार सोफिया वर्गेरा हिची वार्षीक कमाई 315 कोटी इतकी राहिली आहे. हॉलीवुड स्टार रिज विदरस्पून या यादीत 250 कोटी डॉलर्स इतक्या कमाईसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, निकोल किडमैन आणि जेनिफर एनिस्टन अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे.