Prabhas First Look from Radhe Shyam: राधे श्याम सिनेमातील प्रभास चा फर्स्ट लूक रिलीज; स्टायलिश अंदाज ठरत आहे लक्षवेधी
Prabhas as Vikramaditya in Radhe Shyam (Photo Credits: Twitter)

बाहुबली (Bahubali) स्टार प्रभास (Prabhas) 'राधे श्याम' (Radhe Shyam) या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील प्रभासचा फर्स्ट लूक (First Look) समोर आला आहे. सिनेमातील प्रभासची पहिली झलक निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात प्रभास अगदी हँडसम आणि स्टायलिश दिसत आहे. प्रभासचा हा अंदाज चाहत्यांचे मन जिंकेल तर महिला चाहत्यांना घायाळ करेल, हे नक्की. राधे श्याम सिनेमाच्या पोस्टरमध्ये प्रभास आपल्या Cool Dude अंदाजात दिसत आहे. त्याचा हा स्टायलिश अंदाज लक्षवेधी ठरत आहे.

23 ऑक्टोबर रोजी प्रभासचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दोन दिवस आधी सिनेमातील प्रभासचा लूक शेअर करत निर्मात्यांनी चाहत्यांना छान सरप्राईज दिले आहे. यापूर्वी पूजा हेगडे आणि प्रभास यांचा रोमांटिक लूक प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. (Adipurush चित्रपटात भगवान राम ची भूमिका साकारणा-या अभिनेता प्रभास च्या ट्रान्सफॉर्मेशनबाबत दिग्दर्शक ओम राऊत यांनी दिली 'ही' माहिती)

पहा प्रभासचा राधे श्याम सिनेमातील फर्स्ट लूक:

या सिनेमात प्रभास सह पूजा हेगडे आणि कुणाल रॉय कपूर हे देखील झळकणार आहेत. तर ब्वेत्रण अभिनेत्री भाग्यश्री हिची देखील सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन तेलुगू सिनेमांचे दिग्दर्शक राधा कृष्णा कुमार करत असून हा सिनेमा हिंदी आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.