बाहुबली फेम प्रभास (Prabhas) याने बहुचर्चित 3D अॅक्शन ड्रामा चित्रपट 'आदिपुरुष' (Adipursh) मध्ये काम करणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. त्याचबरोबर 'तानाजी: द अनसंग वॉरियर' सारखा ब्लॉगब्लस्टर हिट चित्रपट देणा-या दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) हे आदिपुरुष चित्रपटाचे दिग्दर्शक असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटात आणखी कोणकोणते स्टार्स असणार याचीही सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यात प्रभासने भगवान राम पात्र साकारण्यासाठी काय विशेष तयारी केली आहे हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.
याबाबत सविस्तर माहिती देत Tabloid शी बोलताना सांगितले की, 'भगवान राम हे पात्र साकारण्यासाठी प्रभास विशेष मेहनत घेत आहेत. त्यासाठी तो सध्या धनुर्विद्येचे धडे घेत आहेत. यासाठी खास प्रशिक्षक नेमण्यात आला आहे. त्यातबरोबर एका धर्नुधारीसारखे पिळदार देहयष्टी बनविण्यासाठीही तो विशेष मेहनत घेत आहेत.' Radhe Shyam Movie: दाक्षिणात्या सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे चा ‘राधे श्याम’ चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित; पहा रोमँटिक फोटोज
प्रभासच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, त्याच्या आगामी साय-फाय (Sci-Fi) चित्रपटात दीपिका पादुकोणसोबत प्रथमच स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन ( Nag Ashwin) यांनी याबाबत घोषणा केली आहे. आज वैजयंती मूव्हिज (Vyjayanthi Movies)ट्विटरवर याची घोषणा करुन या नव्या जोडीला ते प्रथमच एकत्र आणणार असल्याचे सांगितले आहे.