Adipurush: प्रभास आणि सैफ अली खानच्या मेगा बजेट 'आदिपुरुष' चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात; अभिनेत्याने सोशल मीडियावर दिली माहिती
आदिपुरुष (Photo Credits: Twitter)

Adipurush: प्रभास (Prabhas) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) स्टारर आदिपुरुष (Adipurush) चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्यांच्या भूमिका आहेत. त्यामुळे या चित्रपटासंदर्भात लोकांना मोठ्या आशा आहेत. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. प्रभासने स्वत: आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. प्रभासने इंस्टाग्रामवर पोस्ट करत आदिपुरुष चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झाली असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी प्रभासने चित्रपटाच्या टेस्ट शूटविषयीही माहिती दिली होती. चित्रपटाच्या सेटवर सुरू असलेल्या टेस्ट शूटचा फोटो शेअर करुन त्याने चाहत्यांना आश्चर्यचकित केलं होतं. त्यानंतर त्याने आता चित्रपटाच्या शूटिंगविषयी माहिती दिली आहे.

सत्ययुगच्या रामायणात दिव्य व चमत्कार दाखवण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत स्पेशल इफेक्ट्स आणि व्हीएफएक्सची मदत घेणार आहेत. जेणेकरून ते प्रेक्षकांना त्या युगात घेऊन जाण्यास सक्षम असतील. ज्यांची त्यांनी कल्पना केली आहे. व्हीएफएक्ससाठी अवतार आणि स्टार वॉर्स सारख्या हॉलिवूड चित्रपटांच्या टीमसोबत संपर्क साधण्यात आला आहे. ओम राऊत प्रेक्षकांना नेहमी वेगळा अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील असतात. (Upcoming Web Series And Movies: फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार 'या' वेब सीरिज आणि चित्रपट; पहा संपूर्ण यादी)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

या चित्रपटात प्रभास भगवान रामची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर सैफ अली खान रावणच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 11 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होईल. वास्तविक निर्मात्यांनी प्रदर्शनासाठी मोठ्या वीकेंडची निवड केली आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.