
Shiv Kumar Subramaniam Passed Away: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि पटकथा लेखक शिव कुमार सुब्रमण्यम (Shiv Kumar Subramaniam) यांचे रात्री उशिरा निधन झाले. अभिनेत्याच्या निधनाचे वृत्त समोर येताच संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. शिवकुमार यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या वृत्तावर दुःख व्यक्त करत बिना सरवर यांनी ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, 'खूप दुःखद बातमी. मुलगा जहानच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा जहाँ याला ब्रेन ट्युमर झाला होता. 16 व्या वाढदिवसापूर्वी त्यांचे निधन झाले.' मिळालेल्या माहितीनुसार, सुब्रमण्यम यांच्या पार्थिवावर सोमवारी 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मोक्षधाम हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (हेही वाचा - Mahatma Jyotirao Phule Biopic: महात्मा फुले यांच्यावरील बायोपिकची घोषणा; Prateek Gandhi आणि Patralekha दिसणार मुख्य भूमिकेत)
शिवकुमार सुब्रमण्यम गेल्या वर्षी आलेल्या 'मीनाक्षी सुंदरेश्वर' या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत होती. याशिवाय अभिनेता अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्येही दिसला आहे. त्यांनी काही चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या आहेत. अभिनेत्याने विधू विनोद चोप्राच्या 'परिंदा' आणि सुधीर मिश्रा यांच्या 'हजारों ख्वाहिशें ऐसी' या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.
Gutted to hear this news. Incredibly tragic, esp as it happened just two months after the passing of his and Divya’s only child - Jahaan, taken by a brain tumour 2 weeks before his 16th birthday.
RIP #ShivkumarSubramaniam https://t.co/GkW6ATUhhN
— beena sarwar (@beenasarwar) April 10, 2022
त्यांच्या शानदार कारकिर्दीत, त्यांना परिंदा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा आणि हजारों ख्वाहिशें ऐसीसाठी सर्वोत्कृष्ट कथेसाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय शिव कुमार '2 स्टेट्स', 'तीन पत्ती', 'प्रहार' आणि राणी मुखर्जी स्टारर 'हिचकी' या चित्रपटातही दिसला होता. शिवकुमार सुब्रमण्यम यांनी 'मुक्ति बंधन' या टीव्ही शोमध्येही काम केले होते.