Mahatma Jyotirao Phule Biopic: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशात सामाजिक बदल घडवून आणण्यात आणि महिलांना शिक्षण देण्यात मोलाची भूमिका बजावली. या दोन महान व्यक्तींचे योगदान देश कधीही विसरणार नाही. लोकांच्या जीवनात उल्लेखनीय बदल घडवून आणण्यासाठी काम करणाऱ्या या पती-पत्नी जोडीवर लवकरच एक बायोपिक बनणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनंत महादेवन 'फुले' या हिंदी फीचर फिल्मच्या लेखन आणि दिग्दर्शनाचे नेतृत्व करणार आहेत. तसेच प्रतीक गांधी आणि पत्रलेखा सारखे प्रख्यात कलाकार महात्मा फुले आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या सावित्री फुले यांच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)