देशभरात दिवाळी (Diwali 2020) मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र, करोनाची पार्श्वभूमी तसेच प्रदूषणाचा विचार करुन यावर्षी फटाके न फोडता इकोफ्रेन्डली दिवाळी (Eco Friendly Diwali) साजरी करण्याकडे अनेकांचा कल दिसत आहे. दरम्यान, प्रत्येकांनी इकोफ्रेंडली आणि प्रदुषणरहित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, इकोफ्रेंडली दिवाळी म्हणणारी अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) दिवाळीच्या फटक्यांमुळे नेटकऱ्यांची शिकार ठरली आहे. दिवाळीच्या फटाक्यांच्या पॅकेट्सवर असलेल्या तिच्या फोटोमुळे अनेकांनी तिला ट्रोल केले आहे.
'प्रदुषण वाढल्यामुळे संसर्ग वाढला आहे. प्रदुषणामुळे कोरोनाचा विषाणू आपल्या श्वसन संस्थेंवर घातक परिणाम करतो. म्हणूनच दिवाळीत प्रदुषण करणारे फटाके कमी करावेत, अशी विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी राज्यातील जनतेला केली आहे. यामुळे यंदाची दिवाळी प्रदुषणमुक्त साजरी करण्याकडे सर्वांचा कल आहे. दरम्यान, दरम्यान या आनंदाच्या वातावरणात सध्या अभिनेत्री परिणीती चोप्रा प्रचंड चर्चेत आहे. परिणीतीचे फोटो विविध प्रकारच्या फटाक्यांच्या पॅकेट्सवर परिणीचा फोटो दिसत आहे. यामुळे इकोफ्रेंडली दिवाळी साजरी करणारी परिणीती आता ट्रोल होताना दिसत आहे. हे देखील वाचा- Diwali 2020: प्रियंका चोपडा हिने शेअर केला निक जोनस सोबत दिवाळी साजरा करतानाचा सुंदर फोटो, दोघांची केमिस्ट्री पाहून व्हाल हैराण
परिणीती चोप्रा यांचे ट्विट-
Hahahha 💕 But please don’t burst crackers! Have a safe and quiet diwali 💕 #PollutionFree #SayNoToCrackers https://t.co/kXAXFhcFGQ
— Parineeti Chopra (@ParineetiChopra) November 13, 2020
दरम्यान, परिणीतीने गंमतीशीर प्रत्युत्तर देऊन या ट्रोलर्सला शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. “हाहाहाहा…. कृपया फटाके फोडू नका. सुरक्षित आणि शांत राहून दिवाळीचा आनंद घ्या.” अशा आशयाचे ट्विट तिने केले आहे.