Diwali 2020: प्रियंका चोपडा हिने शेअर केला निक जोनस सोबत दिवाळी साजरा करतानाचा सुंदर फोटो, दोघांची केमिस्ट्री पाहून व्हाल हैराण

Diwali 2020: प्रियंका चोपडा हिने शेअर केला निक जोनस सोबत दिवाळी साजरा करतानाचा सुंदर फोटो, दोघांची केमिस्ट्री पाहून व्हाल हैराण
प्रियंका चोपड़ा (Photo Credits: Instagram)

जगभरात दिवाळी सणाचा उत्साह 14 नोव्हेंबरला साजरा करण्यात आला. दिव्यांच्या या सणानिमित्त सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले. याच पार्श्वभुमीवर बॉलिवूड कलाकारांनी सुद्धा दिवाळीचा सण धुमधडाक्यात साजरा केला. तर सोशल मीडियात सुद्धा पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच आता प्रियंका चोपडा हिने सुद्धा निक जोनस याच्या सोबत दिवाळी साजरा करतानाचा सुंदर फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये प्रियंका चोपडा आणि निक जोनस यांनी अत्यंत रोमँटिक पद्धतीने पोज देताना दिसून येत आहेत. दिवाळीनिमित्त प्रियंका हिने फ्लॉवर पॅटर्न मधील साडी घातली असून निक जोनस याचा ब्लॅक रंगातील कपड्यातील लूक सुद्धा भारी दिसत आहे. या दोघांच्या हातात दिवा घेऊन एकमेकांकडे पाहत असल्याचे ही दिसून येत आहे.(Happy Diwali: अमिताभ बच्चन, शिल्पा शेट्टीसह 'या' कालाकारांनी दिवाळीसाठी चाहत्यांसाठी सोशल मीडियात पोस्ट करत दिल्या खास शुभेच्छा)

वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास, प्रियंका चोपडा सध्या फॅमिली बिझनेस सेटअप करण्यात व्यस्त आहे. तर येत्या काळात ती केनु रीवेस च्या मॅट्रिक 4 मध्ये झळकणार आहे. तर प्रियंका आणि निक जोन यांच्या लग्नाला येत्या 1 डिसेंबरला वर्ष पू्र्ण होणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 15, 2020 10:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).