Panghat Song Out: 'Roohi' चित्रपटातील पहिले धमाकेदार गाणे 'पनघट' आले प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा जान्हवी कपूरचा हटके अंदाज, Watch Video
Panghat Song (Photo Credits: YouTube)

'स्त्री' सारखा हिट चित्रपट दिल्यानंतर त्याच्याच एक पाऊल पुढे टाकत अभिनेता राजकुमार राव याचा 'रूही' (Roohi) हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील पहिले गाणे 'पनघट' (Panghat) नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामध्ये राजकुमार राव (Rajkumar Rao), जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि वरुण शर्मा (Varun Sharma) अशी तिगडी जमून आलीय. या गाण्यामध्ये जान्हवीचा थोडा वेगळा आणि हटके अंदाज पाहायला मिळत आहे. तसेच तिचा बोल्ड लूकही तिचे चाहते प्रचंड पसंत करत आहे. या गाण्याला युट्यूबवर 11 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

या गाण्यामध्ये जान्हवी कपूर एका ठिकाणी डोक्यावर ओढणी घेऊन बसली आहे. तेव्हा समोरून हातात वरमाला घेऊन राजकुमार राव आणि वरुण शर्मा येताना दिसत आहे.हेदेखील वाचा- Roohi Motion Poster: राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर 'रूही' चित्रपटाचे पोस्टर आले समोर

पनघट हे गाणे असीस कौर, दिव्या कुमार, सचिन-जिगर यांनी गायले आहे. या गाण्याचे गीतकार अमिताभ भट्टाचार्य असून सचिन-जिगर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. हे गाणे सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

रूही या चित्रपटात राजकुमार राव आणि जान्हवी कपूरसह वरुण शर्मा, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. हार्दिक मेहता यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

येत्या 11 मार्चला हा सिनेमा सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. स्त्री या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिल्यानंतर सर्व प्रेक्षक रूही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.