Aamir Khan Birthday Special: अभिनेता पलिकडील आमिर खान 'या' गोष्टींमुळे आहे 'मिस्टर परफेक्शनिस्ट'!
Aamir Khan (Photo Credits: Twitter)

Aamir Khan's 54th Birthday: बॉलिवूडमध्ये 'खान'चा दबदबा आहे. त्यापैकी एक म्हणजे आमिर खान (Amir Khan) ! आमिर खानचा आज 54 वा वाढदिवस आहे. कलाकर म्हणून आमिर खान जितका संवेदनशील आहे तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही सामाजिक भान जपणारा नागरिक म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात दुष्काळावर मात ( Drought Free Maharashtra

)करण्यासाठी आमिर खानने हातामध्ये कुदळ घेण्यापासून ते महाराष्ट्र ही कर्मभूमी असल्याने 'मराठी' भाषा आलीच पाहिजे हा हट्टाहास जपण्यासाठी वयाची 45 शी ओलांडल्यानंतरही मराठी लिहण्यासाठी, शिकण्यासाठी प्रयत्नशीर असलेला आमिर खान झगमगत्या बॉलिवूड विश्वापासून दूर असला तरीही परफेक्शनिस्ट आहे.

अभिनेत्यापलिकडील आमिर खानचं 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आयुष्य

पाणी फाऊंडेशन

महाराष्ट्र मागील काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळाच्या विळख्यात अडकत आहे. यामधूनच महाराष्ट्रात शेतकर्‍यांचे आत्महत्यांचे सत्र वाढले होते. अशावेळेस ग्लॅमरच्या दुनियेतून बाहेर पडून आमिर खानने 'पाणी फाऊंडेशन' सुरू केलं. सामान्य नागरिक ते मराठी,हिंदी जगतातील कलाकारांनी आमिरला साथ देत अनेक दुष्काळग्रस्त भागांमध्ये श्रमदान केले. आज जलयुक्त शिवार या शासनाच्या उपक्रमामध्ये आमिर खानच्या 'पाणी फाऊंडेशन'ची भरीव कामगिरी आहे. अनेक दुर्गम भागांमध्ये पाण्याची टंचाई मिटली आहे.

मराठीचा अट्टाहास

आमिर खानने बॉलिवूडमध्ये दबदबा निर्माण केल्यानंतरही मराठी ही महराष्ट्राची राज्यभाषा आहे. त्यामुळे त्या भाषेत लिहता, वाचता येणं गरजेचे आहे. हे ओळखून आमिर खान मराठी शिकला. त्यासाठी आमिर खानच्या घरी एक खास व्यक्ती शिकवणी घेण्याकरिता येत असे.

सत्यमेव जयते

अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत आमिर खानदेखील छोट्या पडद्यावर झळकला. 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमातून आमिर खानने समाजातील अनेक चूकीच्या रूढी, अन्यायांविरूद्ध वास्तवातील चित्र उभं केलं. केवळ अन्यायाविरूद्ध चर्चा किंवा प्रशासनाला दोष देत राहण्यापेक्षा त्यातून मार्ग कसा काढला जाऊ शकतो? याबाबतही 'सत्यमेव जयते' कार्यक्रमातून प्रबोधन करण्यात आलं. एकाच वेळी आठ भाषा आणि विविध चॅनल्सवर दिसणार हा भारतातील एकमेव कार्यक्रम होता.

पाणी फाऊंडेशनमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग

पाणी फाऊंडेशन मधून 'जलमित्र' आणि वॉटरकप उपक्रम आमिर खानने सुरू केला. मात्र हा उपक्रम पुढे अखंडीत राहण्यासाठी आमिर खानने विद्यार्थ्यांचाही या उपक्रमामध्ये सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. शरद पवारांनी भेट घेऊन आमिर खानला या प्रोजेक्टला अधिक व्यापक करण्याचा सल्ला दिला होता.

आमिर खान बॉलिवूडमध्ये त्यांच्या भूमिकांबद्दल चोखंदळ असण्यामुळे मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. पण त्याच्या आयुष्यात अनेक गोष्टींमुळे तो झगमगत्या जगासोबत सामान्यांच्या आयुष्यातही 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आहे.