भारत आणि पाकिस्तान यांच्यात अजूनही तणाव कायम आहे. फुलवामा येथील हल्ल्यानंतर तर या दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये अनेक बदल होत गेले. दोन्ही देशांनी एकमेकांच्या कलाकारांना आपल्या देशात काम करण्यावरही बंदी घातली आहे. दरम्यान, पाक गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) हे गायक हर्षदीप कौर आणि डिझायनर विजय अरोरा यांच्या ऑनलाइन मैफिलीला उपस्थित होते. या संदर्भात, फेडरेशन आणि वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (एफडब्ल्यू आयसीई) भारतीय गायकांना नोटिसा बजावल्या आहेत आणि अशा प्रकारच्या कृती पुन्हा झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत एफडब्ल्यूआयसीईचे सरचिटणीस अशोक दुबे म्हणाले, ‘शनिवारी विजय अरोरा आणि हर्षदीप कौर यांनी एकत्रितपणे ऑनलाइन गायनाचा कार्यक्रम केला, ज्यामध्ये पाक गायक राहत फतेह अली खान यांचा समावेश होता. आम्ही आधी एक सर्क्युलर जारी केले होते, भारतीय कलाकार कोणत्याही प्रकारे पाकिस्तानी कलाकारांशी काम करणार नाहीत असे सांगितले होते, मात्र तरीही हे घडत आहे.’
दुबे पुढे म्हणाले, ‘हे लोक लॉकडाउनच्या आश्रयाने का असो असे घडत असेल तर ते चुकीचे आहे. व्यावसायिक पातळीवर जरी याचा उपयोग करून घेतला जात नसेल, तरी हे अमान्य आहे. आजही पाकिस्तानी सैनिक भारतीय सैनिकांवर हल्ले करीत आहेत. तसेच, हे विसरू नये की गेल्या वर्षी पुलवामा हल्ल्यानंतर कोणताही भारतीय कलाकार किंवा संगीतकार पाक कलाकाराबरोबर काम करणार नाही हे स्पष्ट केले होते.’ (हेही वाचा: Lockdown काळात सलमान खान ने मालेगाव मधील महिला मजुरांची मदतीची हाक ऐकली; 50 कामगारांसाठी पाठवून दिला किराणा)
मात्र जरी असे घडले तर, अशा भारतीय कलाकारांवर बंदी घालण्यात येईल, व हे सुनिश्चित केले जाईल की, फिल्म इंडस्ट्री अशा लोकांना काम देणार नाही. ही अंतिम चेतावणी आहे. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही, असेही दुबेजी म्हणाले.