Nitish Bharadwaj With Wife (Photo Credits: Instagram)

Nitish Bharadwaj's Complaint Against Estranged Wife: ‘महाभारत’मध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेले नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. अभिनेत्याने पत्नी आयएएस स्मिता गाटे यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याचे वृत्त आहे. नितीश यांनी पत्नीवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. फ्री प्रेस जर्नलनुसार, नितीश यांनी बुधवारी भोपाळचे पोलीस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांच्याकडे मदत मागितली आहे. नितीश यांनी पत्नीविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे.

त्यांच्या तक्रारीत असे लिहिले आहे की, स्मितासोबतच्या दीर्घ लग्नानंतर दोघांनी 2019 मध्ये मुंबई फॅमिली कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. मात्र पत्नी आपल्याला आपल्या मुलींना भेटू देत नाही. नितीश आणि स्मिता यांना देवयानी आणि शिवरंजनी नावाच्या दोन मुली आहेत. स्मिता सतत मुलींच्या शाळा बदलत राहते. यामुळे नितीश यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होत आहे.

नितीश भारद्वाज यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाचे आदेशही दिले आहेत. नितीश यांची दोन लग्ने झाली आहेत, मात्र त्यांची दोन्ही लग्ने टिकली नाहीत. 1991 मध्ये त्यांनी पहिले लग्न केले. त्यावेळी मोनिषा पाटील यांच्यासोबत त्यांचे वैवाहिक जीवन सुरू झाले, मात्र 2005 मध्ये हे लग्न तुटले. त्यानंतर नितीश भारद्वाज यांनी 2009 मध्ये स्मिताशी लग्न केले होते. (हेही वाचा: Poonam Pandey Defamation Lawsuit: स्वतःच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवणे पूनम पांडेला पडले महागात; 100 कोटींचा मानहानीचा गुन्हा दाखल)

दोघांची भेट काही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून झाली. जिथे दोघांमध्ये मैत्री आणि नंतर प्रेम निर्माण झाले. भेटल्यानंतर काही काळानंतर नितीश आणि स्मिता यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचे नाते टिकले नाही. लग्नाच्या 12 वर्षानंतर म्हणजेच 2022 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. मात्र, 2019 मध्ये नितीश आणि स्मिता वेगळे झाले. दरम्यान, याआधी बॉम्बे टाईम्सशी बोलताना नितीश म्हणाले होते- मी एवढेच सांगू शकतो की कधी कधी घटस्फोट मृत्यूपेक्षाही जास्त वेदनादायक असू शकतो. जेव्हा कुटुंब तुटते तेव्हा सर्वात जास्त त्रास मुलांना होतो. त्यामुळे पालक या नात्याने आपण त्यांची जास्त काळजी घेतली पाहिजे.