प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) ने तिच्या बोल्ड स्टाईलने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. ती अनेकदा तिचे हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. हे फोटोज पाहून चाहत्यांचे होश उडाले आहेत. यावेळीही निया शर्माने असेचं काहीसे केले आहे. नियाने तिच्या नवीन फोटोशूटची एक झलक शेअर केली आहे. ज्यामध्ये तिचा बोल्ड लूक चर्चेत आला आहे. नियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने क्रॉप टॉप शर्ट आणि जीन्स घातलेली दिसत आहे. खास गोष्ट म्हणजे या लूकमध्ये हॉटनेसचा तडका देण्यासाठी नियाने शर्टची वरची बटणे उघडली आहेत. तिने शर्टचा वरचा भाग हाताने पसरवून फोटो क्लिक केले आहेत. नियाच्या बोल्ड लूकने इंटरनेटवर कहर केला आहे.
फोटोंमध्ये नियाने कॅमेऱ्यासमोर अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये पोज दिल्या आहेत. या फोटोंवर चाहते कमेंट करत आहेत. कॉमेंट सेक्शनमध्ये लोक तिची हॉट, सेक्सी आणि हॉटनेस म्हणत प्रशंसा करत आहेत. याशिवाय काही लोकांनी नियाची स्तुती करण्यासाठी फायर इमोजी देखील वापरल्या आहेत. (वाचा - Sophie Choudry ने Blue Bikini वर सोशल मीडियावर लावली आग, हॉटनेस पाहून चाहते झाले थक्क; पाहा फोटोज)
सध्या निया शर्मा तिच्या 'फुंक ले' म्युझिक व्हिडिओमुळे चर्चेत आहे. ती या गाण्याचे जोरदार प्रमोशन करत आहे. नुकताच निया शर्माचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती रस्त्यावर डान्स करताना दिसत आहे. यादरम्यान विशेष बाब म्हणजे त्याच्यासोबत नाचणारे लोक ऑटो रिक्षावाले आहेत. व्हिडिओमध्ये निया 'फुंक ले' गाण्याच्या हुक स्टेप्स करताना दिसत आहे. पांढऱ्या शर्टसोबत काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेली निया अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.
View this post on Instagram
नियाने आतापर्यंत अनेक शोमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. निया शर्माने 'एक हजारों में मेरी बहना है' या शोमधून करिअरची सुरुवात केली होती. या शोमध्ये तिचे काम चाहत्यांना खूप आवडले होते. या शोमधून नियाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. याशिवाय नियाने 'जमाई राजा', 'इश्क में मरजावां' आणि 'नागिन' सारख्या शोमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे.