'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित
एक लड़की को देखा तो ऐसा लगा (Photo Credit- Twitter)

बॉलिवूड आगामी चित्रपट 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा या चित्रपटातून राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि सोनम कपूर (Sonam Kapoor) झळकणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये सोनम आणि राजकुमार राव एकत्र दिसून येत आहे. परंतु पोस्टरच्या माध्यमातून निर्मात्यांच्याद्वारे एक स्मार्ट लूक देण्यात आला आहे.

अभिनेता अनिल कपूर याने ट्विटरच्या माध्यमातून या चित्रपटाचे नवीन पोस्टर पोस्ट केले आहे. चित्रपटाचा पहिला लूक अनिल कपूरच्या वाढदिवसाच्या वेळी झळकला होता. तसेच 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' चे निर्माते आज टायटल ट्रॅकच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.

या चित्रपटात अनिल कपूर, सोनम कपूर, राजकुमार राव आणि जूही जावला यांसारखे दमदार कलाकार त्यांच्या भूमिका पार पाडणार आहेत. फॉक्स स्टार स्टुडिओ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती विधु विनोद चोपडा आणि राजकुमार हिरानी करणार आहे. येत्या 1 फेब्रुवारी, 2019 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.