अनिल कपूर (फोटो सौजन्य- फेसबुक)

बॉलिवूड कलाकारांची (Bollywood Actor) ख्याती सातासमुद्रापलीकडे जाऊन पोहचली आहे. तसेच कलाकारांचे चहाते नेहमी आपल्या आवडत्या कलाकराच्या रुपात राहतात अथवा त्यांची नक्कल करताना दिसून येतात. असाच एक  बॉलिवूडचा चाहता पाकिस्तानमध्ये आढळून आला. मात्र हा चाहता पाकिस्तानी पोलीस असून त्याला बॉलिवूडचा डायलॉग खूपच महागात पडला आहे.

पाकिस्तानच्या पाकपत्तन ( Pakpattan) पोलीस स्थानकातील मोहम्मद अरशद शाह हा कर्मचारी हा बॉलिवूडचा चाहता आहे. त्यामुळे त्याने 'शूट आऊट अॅट लोखंडवाला' (Shoot Out At Lokhandwala) या बॉलिवूड चित्रपटातील अनिल कपूरचा प्रसिद्ध डायलॉग बोलतानाचा व्हिडिओ त्याच्या भाच्याने शूट केला. तर अनिल कपूरने (Anil Kapoor) या चित्रपटात ‘दो वक्त की रोटी कमाता हूं, पांच वक्त की नमाज पढ़ता हूं. इससे ज्यादा मेरी जरूरत नहीं और मुझे खरीदने की तेरी औकात नहीं...’ असा डायलॉग मारला होता. तसेच शाहचा हा अनिल कपूरच्या डायलॉग असलेला व्हिडिओ टिकटॉक (Tiktok) अॅपच्या माध्यमातून सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला.( हेही वाचा -दूरदर्शनवरील सुपरहिरो Shaktiman आता Amazon Prime वर )

मात्र व्हिडिओ व्हाययरल झाल्याने पाकिस्तानच्या प्रशासनाने(Pakistan Goverment) शाह याच्या विरुद्ध कारवाई करुन त्याला कामावरुन निलंबित केले आहे. यापूर्वीसुद्धा पाकिस्तानच्या प्रशासनाने बॉलिवूड चित्रपट (Bollywood Movies) आणि हिंदी मालिका (Hindi Serials) पाकिस्तानमध्ये दाखविण्यास बंदी घातली होती.