देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून त्याच्या सर्वांनाच मोठा फटका बसत आहे. तर दररोज मोठ्या संख्यने कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असून यामध्ये बॉलिवूडसह टीव्ही कलाकारांचा सुद्धा समावेश आहे. अशातच आता अभिनेता नील नितीन मुकेश (Neil Nitin Mukesh) याच्यासह परिवारातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर नील याची दोन वर्षांची मुलगी नूरवी हिचे सुद्धा कोरोनाचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत.(Arjun Rampal Tests Positive For COVID-19: अर्जुन रामपाल याला कोविड-19 ची बाधा; सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती)
नील नितीन मुकेश याने इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. त्याने असे म्हटले आहे की, ''प्रत्येक प्रकारे सावधगिरी बाळगा आणि घरात राहून सुद्धा, माझ्या परिवारातील लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही सर्वजण क्वारंटाइन झालो असून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेत आहोत. तसेट सर्व नियमांचे सुद्धा पालन केले जात आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद यासाठी धन्यवाद. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. त्याचसोबत नील याने म्हटले की, तुमचे प्रेम आणि आशीर्वादाची गरज आहे.पणही स्थिती गंभीर असून ती हलक्यात घेऊ नका.''(Sonu Sood Tests Positive for COVID19: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)
View this post on Instagram
नील याने एका मुलाखतीत त्याच्यासह मुलीच्या प्रकृतीसंदर्भात सांगितले की, तुम्ही समजू शकता की माझ्या या गोष्टीसोबत राहणे किती मुश्किल आहे. कारण नूरवी हिला सुद्धा कोरोना झाला आहे. तिची चाचणी सुद्धा पॉझिटिव्ह आली आहे.