Arjun Rampal Tests Positive For COVID-19: अर्जुन रामपाल याला कोविड-19 ची बाधा; सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती
Arjun Rampal (Photo Credits: Instagram)

देशात आलेल्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत (Coronavirus Second Wave) अनेकजण संसर्गाच्या कचाट्यात सापडले आहेत. बॉलिवूड कलाकारांभोवती देखील कोविड-19 (Covid-19) चा विळखा बसला आहे आणि दिवसेंदिवस हा अधिक घट्ट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील 48 तासांत पवन कल्याण, सोनू सूद, मनीष मल्होत्रा, सुमित व्यास यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता अभिनेता अर्जुन रामपाल  (Arjun Rampal) याला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्याने ही माहिती दिली. कोणतीही लक्षणं नसूनही त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे अर्जुनने पोस्टमध्ये म्हटले आहे.

अर्जुन रामपालने इंस्टाग्राम पोस्टद्वारे लिहिले, "माझी कोविड-19 टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. परंतु, माझ्यात कोणतीही लक्षणं नाहीत. सध्या मी स्वत:ला आयसोलेट केले आहे. औषधं देखील घेत आहे. सर्व नियमांचे पालन करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आवश्यक काळजी घ्या. हा अत्यंत कठीण काळ आहे. परंतु, आता आपण जागरुक राहीलो तर त्यातून बाहेर पडू शकतो. एकत्रितपणे आपण कोरोनाला हरवूया."

पहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun (@rampal72)

(फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; स्वत:ला होम क्वारंटाईन करत सोशल मीडियावर दिली माहिती)

दरम्यान, कंगना रनौत हिच्या धाकड़ सिनेमात अर्जुन रामपाल खलनायकाची भूमिका साकारत आहे. 1 ऑक्टोबर 2021 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

देशासह राज्यात कोरोनाची दिवसेंदिवस होत जाणारी गंभीर परिस्थिती आपण पाहत आहोत. त्यामुळे खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसंच नियमांचे पालन करुन कोविड-19 विरुद्धच्या लढाईत सरकारला सहकार्य करणे अत्यंत आवश्यक आहे.