Neha Kakkar Roka ceremony (Photo Credits: Instagram)

आपल्या आवाजाने अवघ्या तरूणाईवर मोहिनी घातलेली गायिका नेहा कक्कड़ (Neha Kakkar) लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. ही बातमी वा-यासारखी पसरली. ही बातमी ऐकून तिचे अनेक चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला तर अनेक तरुणांची मने दुखावली गेली. त्यात तिची लग्नपत्रिका सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर नेहा लवकरच लग्नगाठीत अडकली जाणार आहे अशी अनेकांची खात्री पटली. रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) याच्यासोबत तिचा विवाह होणार असून नुकताच त्यांची रोका सेरेमनी झाली. या कार्यक्रमाला तिच्या आणि रोहनप्रीतच्या घरातील मोजकी लोक उपस्थित होती. या कार्यक्रमाचा एक क्युट व्हिडिओ नेहा नुकताच शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये नेहा छान लेहंगा परिधान केला असून रोहनप्रीतचा लूक देखील काही औरच आहे. हे दोघेही भांगड्याच्या तालावर ठेका धरताना दिसत आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून 18 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. Neha Kakkar Wedding Card Leaked: प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड़ आणि रोहनप्रीत सिंह यांची लग्न पत्रिका व्हायरल; पहा लग्नाची तारीख व ठिकाण

पाहा व्हिडिओ

नेहा ने इन्स्टाग्राम #Nehudavyah वापरत आप्या रोका सेरेमनीचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. नेहा च्या लग्नपत्रिकेनुसार 26 ऑक्टोबरला या दोघांचा विवाह होणार आहे असे सांगण्यात येत आहे.

नेहाचे तिचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहलीसोबत ब्रेक अप झाल्यानंतर तिचे नाव उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण सोबत जोडले गेले होते. मात्र तो केवळ शोचा TRP चा भाग होता असे नंतर सांगण्यात आले होते. मात्र आता नेहा खरीखुरी रोहनप्रीतसोबत विवाहबंधनात अडकत आहे ही बातमी पक्की झाली आहे.