अभिनेत्री दीपिका पादुकोणने घेतली आपल्या एक्सबॉयफ्रेंडच्या आई-बाबांची भेट, अभिनेत्री नीतू सिंग ने सोशल मिडियावर केला फोटो शेअर
Deepika Padukone meet rishi kapoor (Photo Credit: Instagram)

मेट गाला 2019 (Met Gala 2019) सोहळ्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण(Deepika Padukone) न्यूयॉर्क जाऊन पोहोचली. नुकताच संपन्न झालेल्या ह्या सोहळ्यानंतर दीपिका न्यूयॉर्कमध्ये गेल्या कित्येक महिन्यापासून तिथे स्थायिक असलेल्या ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि नीतू सिंगला (Neetu Singh) भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेली. कॅन्सरवरील उपचारासाठी ऋषी कपूर आपल्या पत्नीसह तिथे राहत आहे.

 

View this post on Instagram

 

Such a fun evening with adorable @deepikapadukone .. gave lot of love n warmth 😍🥰

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) on

नीतू सिंग ने दीपिकासोबतचा तिघांचा फोटो शेअर करुन 'दीपिकासोबत घालवलेली एक छान संध्याकाळ' असे कॅप्शन लिहिले आहे. मात्र तिने ही पोस्ट शेअर करताच अनेकांनी नीतू सिंगला ट्रोल केले आहे. 'ही नाटकी कशाला, जेव्हा दीपिका तुमच्या मुलाची गर्लफ्रेंड होती, तेव्हा ती तुम्हाला आवडत नव्हती.' असा फोटो आधी का नाही शेअर केलात' जेव्हा दीपिका रणबीर (Ranbir Kapoor) ची गर्लफ्रेंड होते, असे लिहून अनेकांनी नीतू सिंगला ट्रोल केले आहे.

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर कॅन्सरमुक्त, दिग्दर्शक राहुल रावेल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला खुलासा

ऋषी कपूर गेले काही महिने कॅन्सरवर उपचावर करण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते. मात्र आता त्यांनी कॅन्सरवर मात केली आहे. तसेच लवकरच मुंबईत परत येतील, असे अभिनेता रणबीर कपूर ने अलीकडे दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.