
National Film Awards 2023 Winner List: देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा गुरुवारी करण्यात आली. 2023 मध्ये होणार्या पुरस्कारांच्या 69 व्या आवृत्तीत प्रामुख्याने 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा समावेश आहे. दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषदेद्वारे विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या विशेष पुरस्कार सोहळ्यात विवेक अग्निहोत्रीच्या द काश्मीर फाइल्सची नर्गिस दत्त पुरस्कार राष्ट्रीय एकात्मता सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत विजेती म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 च्या ज्युरीमध्ये यतेंद्र मिश्रा, केतन मेहता, नीरज शेखर, बसंत साई आणि नानू भसीन यांचा समावेश आहे. हा पुरस्कार यावेळी 31 फीचर, 24 नॉन फीचर आणि 3 श्रेणीतील सर्वोत्कृष्ट लेखन श्रेणीत दिला जाणार आहे.
दरम्यान, विकी कौशल स्टारर सरदार उधम आणि माधवनची रॉकेट्री - द नंबी इफेक्ट ही सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्म म्हणून निवडली गेली आहे. 'सरदार उधम' प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला होता, तर 'रॉकेटरी - द नंबी इफेक्ट' चित्रपटगृहात प्रदर्शिद झाला होता. याशिवाय पुष्पा - द राइज या तेलगू चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्ट आणि क्रिती सेनन यांना मिळाला आहे. आलियाला गंगूबाई काठियावाडीसाठी आणि क्रितीला मिमीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सृष्टी लाखेरा दिग्दर्शित एक था गाव या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट नॉन-फिचर फिल्म म्हणून निवड झाली आहे. चित्रपट निर्माते नेमिल शाह यांचा गुजराती चित्रपट दाल भट सर्वोत्कृष्ट लघुपट (फिक्शन) म्हणून निवडला गेला आहे. (हेही वाचा - 69th National Film Awards Announcement: सलील कुलकर्णी दिग्दर्शित 'एकदा काय झालं' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट)
69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी-
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म - सरदार उधम, रॉकेट्री - द नंबी इफेक्ट्स
सर्वोत्कृष्ट अभिनेता - अल्लू अर्जुन (पुष्पा - द राइज)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी), क्रिती सॅनन (मिमी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - निखिल महाजन मराठी चित्रपट गोदावरी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - पल्लवी जोशी (द काश्मीर फाइल्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - पंकज त्रिपाठी (MM)
विशेष ज्युरी पुरस्कार - शेरशाह
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन - डीएसपी (पुष्पा आणि आरआरआर)
नर्गिस दत्त पुरस्कार राष्ट्रीय एकात्मता सर्वोत्कृष्ट चित्रपट- द काश्मीर फाइल्स
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर - सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन - सरदार उधम सिंग
उत्कृष्ट संपादन - गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - आर आर आर
सर्वोत्कृष्ट छायांकन - सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट पुरुष गायक - काळ भैरव
कला, संस्कृती, चित्रपट आणि साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कलाकारांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिला जातो. कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी देशात स्वातंत्र्यानंतर याची सुरुवात झाली. चांगल्या चित्रपटांच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळावे हाही या पुरस्कारांमागचा उद्देश होता. फीचर, नॉन-फिचर आणि सिनेमातील सर्वोत्कृष्ट लेखन अशा तीन श्रेणींमध्ये हा पुरस्कार विभागला गेला आहे.