Mumbai Rains:  अमिताभ बच्चन यांनी 'मुंबई' ची 'तुंबई' झालेल्या स्थितीवर केलं खास ट्विट! सोशल  मीडियात Meme व्हायरल
Amitabh Bachchan (Photo Credit: Twitter)

मुंबईमध्ये मागील 24 तास कोसळणार्‍या धो धो पावसामुळे सध्या मुंबईची तुंबई झाली आहे. सखल भागात सुमारे अडीच ते तीन फूट पाणी असल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. यामध्ये सामान्यांसोबतच राजकीय नेते आणि सेलिब्रिटींचीदेखील कोंडी झाली आहे. मुंबईतील सध्याच्या परिस्थितीवर बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी खास मीम शेअर केलं आहे. राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरात शिरले नाल्याचे पाणी, शिवसेनेने करून दाखवलं म्हणत व्यक्त केली नाराजी

अमिताभ बच्चन यांचं खास ट्विट

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या ट्विट मध्ये 'The Great Gambler'सिनेमातील 'दो लब्जो की है...' यागाण्यातील एक फोटो शेअर केला आहे. बोटीमध्ये बसलेला हा अमिताभ बच्चन यांचा फोटो मिम्सच्या स्वरूपात बनवण्यात आला आहे. यामध्ये जलसा होते हुए भैय्या गोरेगाव लेना..' अशा आशयाचं ट्विट काही वेळापूर्वी बिग बी यांनी केलं आहे. जलसा या बिग बींच्या राहत्या घराबाहेर सध्या प्रचंड पाणी तुंबलेलं आहे.

मुंबईमध्ये मागील 3 दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. जून महिन्याच्या सरासरी इतका पाऊस मागील 3 दिवसात झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.