बॉलिवूड मधील सुपरस्टार अक्षय कुमार (Akashy Kumar) याने महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या सोबत मुंबई पोलिसांच्या एका समारंभाला उपस्थिती लावल्याचे दिसून आले. शनिवारी संध्याकाली झालेल्या या कार्यक्रमात मुंबई पोलीस प्रमुख परम बीर सिंह ही होते. पोलीस कर्मचाऱ्यांना वांद्रे समुद्र किनाऱ्यावर गस्त घालण्यासाठी सेगवे (इलेक्ट्रिक बाइक) चे वाटप करण्यात आले.
या समारंभावेळी अक्षय कुमार याने असे म्हटले की, मी अत्यंत खुश आहे आणि गर्व वाटतो की मुंबई पोलिसांनी हे सेगवे दिले गेले आहे. ज्याच्या माध्यमातून ते बहुतांश गोष्टी नियंत्रित करु शकणार आहेत. मला वाटते क मुंबईकरांसाठी ही चांगली बातमी आहे. तसेच या समारंभाला उपस्थिती लावण्याचा मान दिल्याबद्दल मी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारचा आभारी आहे. यावेळी भाजप आमदार आशिष शेलार आणि मुंबईचे संयुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची सुद्धा उपस्थिती दिसून आली.(Akshay Kumar ने आपल्या अॅक्शन गेम FAU-G चं अॅन्थम सॉन्ग केलं रिलीज; पहा जबरदस्त व्हिडिओ)
View this post on Instagram
वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास 2021 मध्ये बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमार धमाका करणारआहे. फरहाद समजी यांचे दिग्दर्शन असलेला 'बच्चन पांडे' मध्ये कृति सेनन हिच्या सोबत झळकणार आहे. तसेच आनंद एल राय दिग्दर्शित 'अतरंगी रे' मध्ये धनुष आणि सारा अली खान यांच्यासोबत चित्रपटात दिसणार आहे. चित्रपट 'बेल बॉटम' मध्ये सुद्धा हुमा खुरेशी आणि लारा दत्ता सोबत दिसणार आहे.