Akshay Kumar ने आपल्या अ‍ॅक्शन गेम FAU-G चं अॅन्थम सॉन्ग केलं रिलीज; पहा जबरदस्त व्हिडिओ
Akshay Kumar FAU-G Theme Song(Photo Credits: Instagram)

Akshay Kumar FAU-G Theme Song: अक्षय कुमारने आज त्यांचे फौजी (FAU-G Fearless and United Guards) अॅन्थम साँग (Aanthem Song) रिलीज केले आहे. हे गाणे देशभक्ती आणि उत्कटतेने भरलेले आहे. अक्षय आणि त्याची टीम बर्‍याच काळापासून यावर काम करत होती. त्यानंतर आज आपल्या चाहत्यांसाठी अक्षयने हे गाणं रिलीज केलं आहे. अक्षय कुमारने फौजी गाण्याचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना अक्षयने म्हटलं आहे की, “फौजी अॅन्थम. समस्या देशातील असो की बॉर्डरची... हे भारताचे नायक नेहमीचं उभे असतात. ते निर्भिड आणि एकत्रित सुरक्षा कर्मचारी आहेत. आमचे सैनिक! हे गाण पहा. आताच नोंदणी करा. "

अक्षय कुमारने शेअर केलेले फौजी गाणं इंटरनेटवर चांगलचं गाजलं आहे. तसेच सोशल मीडियावरदेखील हे गाणं प्रचंड व्हायरल झालं आहे. आतापर्यंत 4 लाखाहून अधिक लोकांनी हे गाणं पाहिलं आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अक्षय लवकरचं 'अतरंगी रे' चित्रपटात दिसणार आहे. (हेही वाचा - Shivkumar Verma Health Update: रुग्णालयात मृत्यूशी झगडत असणारे ज्येष्ठ अभिनेते शिवकुमार वर्मा यांना बॉलिवूड स्टार्सकडून नाही मिळाली मदत; मुलीने FD मोडून केला उपचार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

याशिवाय अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचे शुटींग सुरू आहे. यासोबतचं अक्षय 'राम सेतु' चित्रपटाचीही तयारी करत आहे. अक्षयच्या प्रोजेक्ट्सचा विचार केला असता हे लक्षात येत की, यावर्षी अक्षय कुमार प्रचंड व्यस्त असेल.