Shivkumar Verma Health Update: रुग्णालयात मृत्यूशी झगडत असणारे ज्येष्ठ अभिनेते शिवकुमार वर्मा यांना बॉलिवूड स्टार्सकडून नाही मिळाली मदत; मुलीने FD मोडून केला उपचार
शिवकुमार वर्मा (Photo Credits: Instagram)

Shivkumar Verma Health Update: बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये दिसणारा अभिनेता शिवकुमार वर्मा (Shivkumar Verma) नुकताचं COPD (Chronic Obstructive Pulmonary Disease) मुळे मुंबईतील रूग्णालयात दाखल झाला. अभिनेत्रीच्या कुटूंबियाने त्याच्या उपचारासाठी बॉलिवूडच्या अनेक स्टार्सची मदत घेतली होती. परंतु, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळू शकली नाही. ताज्या मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्याची मुलगी राजसी (Rajsi) ने आपल्या फिक्स्ड डिपाजिटच्या साहाय्याने तिच्या वडिलांवर उपचार केले. सध्या शिवकुमार वर्मा यांना रुग्णालयातून सुट्टी झाली आहे. त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे.

ई-टाइम्सच्या अहवालात शिवकुमार वर्मा यांची मुलगी राजसी म्हणाली की, हे दिवस आमच्यासाठी अत्यंत कठीण होते. वडील 6 दिवस व्हेंटिलेटरवर होते आणि त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले होती. मला माझ्या भावाचीदेखील मदत मिळाली नाही. कारण तो आपल्या मैत्रिणीसोबत कुटुंबापासून वेगळं राहतो. टीव्ही आणि बॉलिवूडमधील कोणीही आम्हाला मदत केली नाही. हे पाहून मला आश्चर्य वाटले. आम्ही अनेकदा मदतीसाठी विनवणी केली पण कोणीही पुढं आलं नाही. काही लोक त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी फोन करत होते. पण आर्थिक मदतीबद्दल बोलले नाही. त्यानंतर मी माझी मुदत ठेव तोडली आणि 5 लाख रुपये जमा केले. (Ankita Lokhande ने Instagram वर पूर्ण केले 30 लाख फॉलोअर्स; ट्रोलर्संनी सुशांत सिंह राजपूत ला दिलं क्रेडिट)

राजसीने पुढे सांगितलं की, "मी एका व्यक्तीच्या ओळखीने अटलांटिस हॉस्पिटलला विनंती केली आणि त्यांनी आम्हाला औदार्य दाखवत उपचार खर्चात थोडा दिलासा दिला. वडिलांच्या उपचारांमध्ये डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, याबद्दल मी त्यांचे आभार मानते."

शिवकुमार वर्मा यांनी 'कहानी तो मैना की' आणि 'नादानियां' या टीव्ही कार्यक्रमांची निर्मिती केली होती. त्यानंतर ते आर्थिक संकटात आले. काही मध्यस्थ व्यक्तीने कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी अधिक पैसे मागितले आणि त्याचा कार्यक्रम टीव्हीवर प्रसारित केला नाही.

राजसी म्हणाली की, तिच्या वडिलांसाठी धूम्रपान एक मोठी समस्या बनली आहे. त्यांनी धम्रपान करणं सोडून दिलं पाहिजे. तसेच, त्यांना वजन (85 किलो) कमी करावे लागेल. याशिवाय श्वासोच्छवासाचे व्यायाम देखील करावे लागतील. वर्मा यांना त्याच्या उपचारासाठी सिन्टा (CINTAA) कडून 50,000 रुपयांची रक्कम मिळाली होती. याशिवाय अभिनेत्री कुणिका लाल यांनीही त्यांना आर्थिक मदत केली.