टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ने शनिवारी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर 30 लाख फॉलोअर्स पूर्ण केल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले. त्याचवेळी, त्यांच्या पोस्टवर काही ट्रोलर्संनी याचे सर्व श्रेय दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत (Sushant Singh Rajput) यांना दिले. अंकिताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर म्हटलं आहे की, "2021 या वर्षाचे मी आपले मनापासून स्वागत करते. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 30 लाख फॉलोअर्स पूर्ण केल्याबद्दल सर्वांचे आभार. हॅशटॅग न्यू इयर 2021. हॅशटॅग 3 मिलियन."
इन्स्टाग्रामवर 30 लाख फॉलोअर्स पूर्ण केल्यानंतर अंकिताच्या एका चाहत्याने कमेंट बॉक्समध्ये अभिनंदन करणारा संदेश दिला. तसेच काही ट्रोलर्सने म्हटलं की, गेल्या वर्षी जूनमध्ये निधन झालेल्या पूर्व प्रियकर दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतमुळे अंकिताचा प्रचार झाला आहे. (हेही वाचा - Anusha Dandekar ने अखेर Karan Kundra सोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांना दिला पूर्णविराम, पोस्ट शेअर करुन सांगितले नातं तुटण्याचे 'हे' कारण)
View this post on Instagram
अंकिता लोखंडे यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात एकता कपूरच्या प्रसिद्ध शो 'पवित्र रिश्ता' मधून केली होती. या शो दरम्यान सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे एकमेकांच्या प्रेमात पडले. 4 वर्षांच्या दीर्घ संबंधानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.