मुंबई: अभिनेते अनुपम खेर यांची COVID 19 चाचणी निगेटीव्ह, मात्र आई, भाऊ, वहिनी, भाची यांना कोरोनाची लागण
Anupam Kher (Photo Credits: Yogen Shah)

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या पाठोपाठ आज बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher ) यांच्या कुटुंबामध्ये कोरोना व्हायरसने (Coronavirus) शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. आज (12 जुलै) अनुपम खेर यांनी ट्वीटर वर व्हिडिओ पोस्ट करत स्वतः ही माहिती दिली आहे. अनुपम खेर यांची आई दुलारी (Dulari)  यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं असून त्यांना अंधेरीच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये (Kokilaben Hospital)  दाखल करण्यात आले आहे. अनुपम खेर यांचा भाऊ, राजू खेर  (Raju Kher), वहिनी, भाची यांची देखील कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. दरम्यान अनुपम खेर यांची देखील चाचणी झाली असून ती निगेटीव्ह आली आहे.

अनुपम खेर यांनी मुंबई महानगर पालिकेला याबद्दल कळवलं असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांना COVID-19 ची प्राथमिक लक्षणे आढळली असून प्रकृती स्थिर, कोविड योद्धांचे मानले विशेष आभार, Watch Video

 

अनुपम खेर ट्वीट

दरम्यान अनुपम खेर हे लॉकडाऊनच्या काळात मुंबईमध्ये घरीच होते. आई आणि भावासोबत ते काळात मजेशीर व्हिडीओ शूट करून शेअर करत होते. दरम्यान त्यांचा सहकलाकारांना, चाहत्यांना कोरोना संकटकाळात काळजी घेण्याचेही आवाहन करत होते.

मुंबईमध्ये सध्या उत्तर भागात कोरोनाचा फैलाव वाढला असल्याचं मागील काही दिवसांपासून समोर आलं आहे. बोरीवली, दहिसर, अंधेरी या भागात रूग्ण वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेकडून मिशन झिरो राबवण्यात येत आहे.