Junaid Shah Passes Away: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सारखा दिसणारा मॉडेल जुनैद शाह चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Ranbir Kapoor Look-Alike, Junaid Shah (Photo Credits: junaid_shah_rk Instagram)

Junaid Shah Passes Away: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सारखा दिसणारा मॉडेल जुनैद शाह (Junaid Shah) याचे हृदयविकाराच्या झटक्याने (Cardiac Arrest) निधन झाले आहे. श्रीनगर येथील घरात त्याचा मृत्यू झाला आहे. काश्मीरी पत्रकार यूसुफ जमील यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. युसुफ हे जुनैदच्या घराजवळ राहत होते.

जुनैद शाहचा चेहरा हुबेहुब रणबीर कपूरप्रमाणे दिसत होता. त्यामुळे तो प्रसिद्ध झाला होता. त्याने मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यामुळे त्याचा प्रचंड मोठा चाहता वर्ग बनला होता. इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जुनैदचे हजारो फॅन फॉलोअर्स होते. (हेही वाचा - सुशांत सिंह राजपूत प्रकरणी CBI चौकशीची गरज नाही- गृहमंत्री अनिल देशमुख)

काही दिवसांपूर्वी रणबीरचे वडिल ऋषी कपूर यांनी जुनैदचा फाटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता.

जुनैदचा चेहरा, वेशभूषा आणि स्टाईल अगदी रणबीर कपूरसारखी होती. विशेष म्हणजे जुनैद अगदी रणबीर कपूरसारखे कपडे परिधान करत असे. जेव्हा जुनैद मार्केटमध्ये जात असे, तेव्हा लोक त्याच्यासोबत सेल्फी काढत असतं. अनेकदा लोकांनी जुनैदलाचं रणबीर कपूर समजलं होतं. त्याने याबद्दल अनेकदा आपले अनुभव शेअर केले होते.