अभिनेता नाना पाटेकरांची नार्को, ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्याची मागणी
अभिनेतान नाना पाटेकर (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

अभिनेता नाना पाटेकर यांची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी अभिनेत्रीने केली आहे. #MeTooमोहिमेअंतर्गत व्यक्त झालेल्या बॉलिवूडमधील अभिनेत्रीने नानांवर गैरवर्तनाचा आरोप केला होता. या अभिनेत्रीने आपल्या वकिलामार्फत ओशिवरा पोलिसांना अर्ज करुन नानांच्या टेस्टची मागणी केली आहे.

दरम्यान, पोलिसांकडे केलेल्या अर्जात या अभिनेत्रीने नाना पाटेकर यांच्यासह इतर चौघांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करावी असे म्हटले आहे. या चौघांमध्ये नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, निर्माता सामी सिद्दीकी आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांच्या नावांचा समावेश आहे.

दरम्यान, अभिनेत्रीने नानांवर केलेल्या आरोपामुळे बॉलिवूडमध्ये दोन गट पडले आहेत. त्यापैकी एक गट नानांच्या बाजूने उभा राहिला आहे. तर, दुसरा आरोप करणाऱ्या अभिनेत्रीच्या बाजूने. दरम्यान, प्रकरण न्यायालयात गेले असून, नानांवर गुन्हाही दाखल झाला आहे.

#MeTooने भारतासह जगभरातील नामवंत अभिनेते, पत्रकार, साहित्यीक आणि काही प्रमाणात राजकीय वर्तुळातही चांगलीच खळबळ उडवली. या मोहीमेचे पडसाद आता इतर इंडस्ट्रीतही उमटू पाहात आहेत. त्यामुळे अनेकांचे हृदय धडधडू लागले आहे.