मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने शेअर केली 'पृथ्वीराज' चित्रपटमधली संयोगिताची पहिली झलक; पहा फोटो
Manushi Chhillar (PC- Instagram)

मिस वर्ल्ड (Miss World) मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) लवकरच बॉलिवूड अभिनेता अक्षय (Akshay Kumar) कुमारच्या 'पृथ्वीराज' (Prithviraj) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात मानुषी संयोगिताच्या भूमिकेत दिसणार आहे. मानुषीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून संयोगिताची पहिली झलक शेअर केली आहे. विशेष म्हणजे अक्षय कुमार या चित्रपटामधून पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटात भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.

मानुषी छिल्लरला पहिल्यांदाच सुपरस्टार अक्षय कुमारसोबत काम करण्यास संधी मिळाल्याने ती संयोगिताची भूमिका साकारण्यास उत्सुक आहे. दरम्यान, मानुषीने सांगितले की, मी माझ्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगचा भरभरून आनंद घेत आहे. सध्या मी शिकण्याच्या प्रक्रियेचा आनंद घेत आहे. अभिनेत्री होण्यासाठी शिकण्याची प्रक्रिया हा सर्वात चांगला टप्पा आहे. यशराज फिल्म्सने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. या विश्वासास मी पात्र ठरवण्याचा प्रयत्न करील. नवीन वर्षात मी माझ्या नव्या करिअरला सुरुवात करत आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी आणि अक्षय कुमारसोबत काम करण्यास उत्सुक आहे, अशी भावनाही मानुषीने व्यक्त केली. (हेही वाचा - शाहरुख खान च्या 'मन्नत' बंगल्यामध्ये जर एक रूम भाड्याने हवी असेल तर काय कराल...)

 

View this post on Instagram

 

Sanyogita #Prithviraj

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar) on

या चित्रपटासाठी मानुषीने अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे. 'पृथ्वीराज' हा चित्रपट प्रसिद्ध राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारीत आहे. या चित्रपटात मानुषी छिल्लर पृथ्वीराज चौहान यांची पत्नी संयोगिता हिची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी करत आहेत.