शाहरुख खान, अभिनेता (Photo credits: IamSRK/facebook)

बॉलीवूडचा किंग खान अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खान सोशल मीडियावर तसा फार ऍक्टिव्ह असतो. तो त्याच्या चाहत्यांसोबत नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. तसेच त्याच्या आयुष्यतील प्रत्येक महत्त्वाचा अपडेट तो चाहत्यांसोबत शेअर करायला कधीच विसरत नाही. याही वेळी त्याने आपल्या चाहत्यांसोबत खास गप्पा मारल्या आहे.

शाहरुखने त्याच्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करत 'Ask me anything' असं एक सत्र सुरु केलं होतं. या सत्रात त्याला त्याचे फॅन्स कोणताही प्रश्न विचारू शकत होते. आणि तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की शाहरुखने जवळपास प्रत्येकालाच त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

एका फॅनने तर चक्क त्याला मन्नत या त्याच्या बंगल्यात एक रूम भाड्याने घ्यायची असेल तर किती किंमत मोजावी लागेल असा मजेशीर प्रश्न विचारला. त्यावर शाहरुखने देखील त्या फॅनला मजेशीर शैलीतच उत्तर दिले आहे. मन्नत सारखं घर हवं असल्यास 30 वर्षांची मेहनत करावी लागते असे शाहरुखने त्या फॅनला म्हटले आहे. शाहरुखचे हे उत्तर सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

Priyanka Chopra चा जगातील सर्वात यशस्वी आणि प्रेरणादायक 100 महिलांमध्ये समावेश Watch Video

तर दुसऱ्या एका फॅनने शाहरुखला क्रिकेट विषयी एक प्रश्न विचारला. कोलकाता नाईट रायडर्स ही त्याची टीम असल्याने, एका फॅनने विचारले की आयपीएलमध्ये कोलकाता संघामध्ये दिनेश कार्तिकच्या ऐवजी शुभमन गिलला कर्णधारपद केव्हा देणार. त्यावर शाहरुखने उत्तर दिले की, जेव्हा तुमची कोलकाता संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नेमणूक होईल तेव्हा नक्की.