Manoj Bajpayee (Photo Credits: Twitter)

Despatch: अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ च्या वेब सिरीज द फॅमिली मॅनच्या दुसर्‍या सीझनची घोषणा केल्यानंतर मनोज बाजपेयी यांनी आपला नवीन चित्रपट डिस्पॅच (Despatch) जाहीर केला आहे. हा चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. क्राइम जर्नालिझम या विषयावर आधारित या चित्रपटात मनोज इनवेस्टिगेटिव जर्नलिस्टची भूमिका साकारणार आहे. मनोजने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती शेअर केली. यात त्याने म्हटलं आहे की, डिस्पॅचसह क्राइम जर्नलिझ्म च्या दुनियेत या. हा थ्रिलर चित्रपट थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन कानू बहल यांनी केले आहे. तसेच रॉनी स्क्रूवाला कंपनी आरएसव्हीपीने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात शहानी गोस्वामीसुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. यश राज फिल्म्ससह दिबाकर बॅनर्जी निर्मित 'ओये लकी, लकी ओए' आणि 'लव से ** और चीट' सारख्या चित्रपटांनंतर दिग्दर्शक कानू बहल यांनी 'तितली' चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केले. तितली हा एक समीक्षात्मक विस्तारित चित्रपट आहे. (वाचा - KGF 2 Release Date: आज होणार ‘केजीएफ 2’ चित्रपटाच्या रिलीज डेट ची घोषणा; केवळ काही तासात समजणार तारीख)

दरम्यान, 2019 च्या वेब सिरीज 'द फॅमिली मॅन' नंतर डिजिटल व्यासपीठावर मनोज बाजपेयींची उपस्थिती वाढली आहे. गेल्या वर्षी, नेटफ्लिक्सवरील मिसेज सीरियल किलरमध्ये मनोज महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या थ्रिलर चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत होती. द फॅमिली मॅनचा दुसरा सीझन 12 फेब्रुवारी रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे.

फॅमिली मॅन मालिकेचे दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केले असून ते थ्रिलर चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. यात मनोज बाजपेयी कौटुंबिक जबाबदाऱ्या घेऊन धोकादायक मिशन पार पाडताना दिसले. त्यांची ही भूमिका चाहत्यांना खूपचं आवडली. यातील पहिल्या सीझनमध्ये 10 भाग होते. या मालिकेत मनोज बाजपेयी यांच्यासोबत शरिज हाश्मी, प्रियामणि, शरद केळकर, नीरज माधव, गुल पनाग आणि दर्शन कुमार महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले होते.