KGF 2 Release Date: आज होणार ‘केजीएफ 2’ चित्रपटाच्या रिलीज डेट ची घोषणा; केवळ काही तासात समजणार तारीख

चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्टर शेअर करत आज सायंकाळी 6:30 वाजता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाईल, असं सांगितलं आहे.

KGF 2 Release Date: आज होणार ‘केजीएफ 2’ चित्रपटाच्या रिलीज डेट ची घोषणा; केवळ काही तासात समजणार तारीख
KGF 2 (Photo Credit - Twitter)

KGF 2 Release Date: कन्नड चित्रपट केजीएफचा दुसरा भाग 'केजीएफ 2' च्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'केजीएफ' च्या प्रचंड यशानंतर चाहत्यांना 'केजीएफ 2' प्रदर्शनाची ओढ लागली आहे. आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. कारण, कन्नड अभिनेता यश आणि संजय दत्त स्टारर फिल्म 'केजीएफ 2' कोणत्या तारखेला प्रदर्शित होणार आहे, याची घोषणा आज केली जाणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्टर शेअर करत आज सायंकाळी 6:30 वाजता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाईल, असं सांगितलं आहे. दिग्दर्शकाने पोस्टर शेअर करताना लिहिलं आहे की, 'आज सायंकाळी साडेसहा वाजता वचन पूर्ण केलं जाईल.' (वाचा - Tandav वेबसिरीजच्या वादावरुन शर्मिला टागोर चितेंत; मुलगा सैफ अली खान ला दिला 'हा' सल्ला)

केजीएफमध्ये प्रख्यात कन्नड अभिनेता यश मुख्य भूमिकेत दिसला होता. मात्र, यावेळी त्याच्यासोबत बॉलिवूडचा खलनायक संजय दत्त आणि बॉलिवूड अभिनेत्री रवीन टंडनही दिसणार आहे. संजय 'केजीएफ 2' मध्ये अधीराची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट कन्नड, तेलगू, हिंदी, तमिळ आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अलीकडे फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांची कंपनी एक्सल एन्टरटेन्मेंटने 'केजीएफ चॅप्टर 2' चे हिंदी हक्क 90 कोटींमध्ये खरेदी केले आहेत. (वाचा - कपिल शर्मा याची पत्नी गिन्नी चतरथ पुन्हा एकदा होणार आई, नव्या चिमुकल्याचे लवकरच होणार आगमन)

यापूर्वी 'केजीएफ चॅप्टर 2' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. यशच्या वाढदिवसाच्या अवघ्या एक दिवस आधी यशच्या चाहत्यांना सरप्राइज देण्यासाठी टीझर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर केजीएफ 2 टीझरने नवा विक्रम नोंदवला होता. या चित्रपटाचा टीझर हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिलेला टीझर बनला होता. या टिझरला केवळ 24 तासात 100 दशलक्षाहून अधिक व्यूज मिळाले होते. 'केजीएफ 2' चित्रपटाची निर्मिती विजय किर्गंदूर ने केली असून प्रशांत नील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट एक्सेल एंटरटेनमेंट, हॉम्बल फिल्म्स आणि एए फिल्म्सद्नारे प्रस्तुत करण्यात आला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2021 02:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).