Actor Anil Murali passes Away: अभिनेता अनिल मुरली यांचे निधन
Prithviraj Sukumaran, Anil Murali (Photo Credits: Instagram)

मल्याळी अभिनेता (Malayalam Actor ) अनिल मुरली (Anil Murali) यांचे निधन झाले आहेत. ते 56 वर्षांचे होते. अनिल मुरली मल्याळी चित्रपट सृष्टी आणि टीव्ही मालिकांमध्ये कार्यरत होते. टीव्हीच्या छोट्या पडद्यावर अनिल मुरली यांनी विशेष अभिनय केला. ज्यामुळे ते मल्याळी जनतेच्या घराघरात पोहोचले. त्यांनी कन्याकुमारीयल ओरू कविता (Kanyakumariyil Oru Kavitha) कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी मल्याळम, तमिळ आणि तेलगू अशा विविध भाषांमध्ये सुमारे 200 पेक्षाही अधिक चित्रपटांतून काम केले.

अनिल मुलली यांनी विविध चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून साकारलेला खलनायक आणि विविध चरित्रात्मक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या. वालकनदी (Valkannadi), लायन (Lion), बाबा कल्याणी( Baba Kalyani), पुथान पनम (Puthan Panam), डबल बॅरेल (Double Barrel), पोकरी राजा (Pokkiri Raja), रन बेबी रन (Run Baby Run), अय्यलम नंजुम थमिल (Ayalum Njanum Thammil ) आणि आययोबिन्ते पुष्टकम (Iyobinte Pusthakam ) हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. (हेही वाचा,'खुलता खळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरे ची गळफास लावून आत्महत्या )

अनिल मुरली यांचे वयाच्या अवघ्या 56 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अनिल मुरली यांना या वर्षाच्या (2020) सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या Forensic मध्ये चाहत्यांनी शेवटचे पाहिले होते.