Malaika Arora Bold Photoshoot: बॉलिवूड अभिनेत्री आणि फिटनेस क्वीन मलायका अरोरा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. मलायका तिच्या हॉट आणि बोल्ड स्टाईलने बॉलीवूडमध्ये देखील एक टॉप अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये मलायका आतापर्यंतच्या सर्वात बोल्ड शैलीत दिसत आहे. मलायकाने हे फोटोशूट तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले असून, तिचे हे फोटो खूपच व्हायरल होत आहेत. मलायकाचे हे फोटोशूट नेहमीप्रमाणे स्टाईलिश आहे. तिच्या या हॉट आणि बोल्ड स्टाईलची फॅन्स कमेंटच्या माध्यमातून प्रशंसा करत आहेत.
क्रॉप ब्लॅक टॉप आणि पिवळा कोट व त्यासोबत नेव्ही ब्लू कलरची पँट मलायकाने या फोटोशूटसाठी परिधान केलं आहे ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश दिसत आहे. अॅक्सेसरीजबद्दल बोलायचे झाले तर तिने एक सिल्वर नेकपिस निवडला आहे. न्यूड रंगाची लिपस्टिकने तिचे सौंदर्य अधिक खुललेले दिसून येते.
तिच्या या फोटोंमधील स्टाईल पाहून अनेक चाहते तिचे कौतुक करत आहेत. मलायकाच्या या फोटोंकडे पाहून अनेकांनी तिच्या फिटनेसचे कौतुक केले. विशेष म्हणजे तिच्या या फोटोवर अनेक सेलेब्स देखील कमेंट करत आहेत.
कपिल शर्मा ने त्याच्या बेबी गर्ल 'अनायरा शर्मा' ची पहिली झलक शेअर केली सोशल मीडियावर (Photos Inside)
अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करण्यासाठी मलायका चर्चेत होती, तसेच त्यांच्या लग्नाच्या बातम्याही येत होत्या. अलीकडेच मलायकाने अर्जुनशी लग्न करण्याबद्दल प्रतिक्रिया देत या बातम्यांवर शिक्कामोर्तब केलं आहे. सन 2020 मध्ये मलायकाला अर्जुनसोबत लग्न करण्यासंदर्भात विचार करणार आहे असं तिने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले आहे.