Chinese Apps Banned in India: केंद्र सरकारने टिकटॉकसह 59 चिनी अॅपवर घातली बंदी आहे. यात टिकटॉकसह (TikTok App) युसी ब्राउजर (UC Browser), कॅम स्कॅनर (Cam Scanner), हॅलो (Helo App), आदी लोकप्रिय अॅपचा समावेश आहे. सरकारच्या या निर्णयानंतर भारतीय नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. बॉलीवुड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेदेखील सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मलायकाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या संदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 'मी लॉकडाउन (Lockdown) मध्ये आतापर्यंतची सर्वात चांगली बातमी ऐकली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आपल्याला लोकांचे विचित्र व्हिडिओ पाहता येणार नाहीत.' मलायकाच्या या प्रतिक्रियावरून तिला टिकटॉक अॅप वापरणं फारस आवडत नसल्याचं स्पष्ट होत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मलायका खूपचं आनंदी असल्याचं समजतयं. (हेही वाचा - आमिर खान च्या कर्मचार्यांमध्ये कोरोनाची लागण; परिवारासह त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह, आईची टेस्ट आज होणार)
याशिवाय अभिनेत्री निया शर्मानेदेखील ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात प्रतिक्रिया देत देश वाचवल्याबद्दल आभार मानले आहेत. 'देश वाचवल्याबद्दल आभार. टिकटॉक नावाच्या व्हायरसला पुन्हा परवानगी देऊ नका,' असं नियाने म्हटलं आहे. (हेही वाचा - आलिया भट आणि संजय दत्त चा 'सडक 2' चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; ट्विटरवर युजर्स करतायत #BoycottSadak2 ला ट्रेंड)
केंद्र सरकारने बंदी घातलेल्या अॅप्सविरोधात अनेक तक्रारी येत होत्या. हे अॅप्स देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडतेसाठी घातक बनत चालले होते. चीन या अॅप्सच्या साहाय्याने भारतीयांच्या डेटाशी छेडछाड करू शकत होता. त्यामुळे अशा धोकादायक अॅप्सची यादी करून सरकारने त्यावर बंदी घातली आहे.