आलिया भट आणि संजय दत्त चा 'सडक 2' चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; ट्विटरवर युजर्स करतायत #BoycottSadak2 ला ट्रेंड
फिल्म 'सड़क 2' चे कास्ट (Photo Credits: File Photo)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रभाव चित्रपटसृष्टीवरदेखील झालेला पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक चित्रपटांचे प्रदर्शन थांबलं आहे. त्यामुळे अनेक चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाचं प्रदर्शन OTT प्लॅटफॉर्मवर करण्याचा निर्णय घेतला आहे. दिग्दर्शक मुकेश भट्ट (Mukesh Bhatt) यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ‘सडक 2’ (Sadak 2) चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे.

या बातमीनंतर सोशल मीडियावर #BoycottSadak2 हा ट्रेंड होत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर नेपोटिझमवरून युजर्सं भडकले आहेत. युजर्संनी नेपोटिझमवरून अनेक कलाकारांना ट्रोल केलं आहे. 'सडक 2' चित्रपट हा नेपोटिझमचं प्रोडक्ट आहे. त्यामुळे नेटीझन्सकडून या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. अशातचं ट्विटरवर #BoycottSadak2 हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. (हेही वाचा - Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर करण जोहरची लोकप्रियता झाली कमी; सोशल मीडियावर 5 लाख युजर्संनी केलं अनफॉलो)

दरम्यान, सडक 2 चित्रपटाचं शुटिंग पूर्ण झालं नाही. परंतु, निर्मात्याने हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज न करता डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. 'सडक’ चित्रपटात अभिनेत्री पूजा भट्ट मुख्य भूमिकेत होती आणि आता ‘सडक’च्या सिक्वेलमध्ये देखील पूजा महत्वाची भूमिका साकारणार आहे. पूजा भट्टसह आलिया भट्ट देखील या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात संजय दत्त 54 वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. याशिवाय या चित्रपटात आलिया पहिल्यांदाच वडीलांसोबत काम करणार आहे.