Kamal Haasan | (Photo Credits: Facebook)

दक्षिण भारतातील सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) यांना रुग्णालयात दाखल होणार असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार 2016 मध्ये कमल हासन यांचा अपघात झाला होता. त्या वेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्या वेळीही त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. तसेच, त्यांच्या दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. भारतीय सिनेसृष्टीत कमल हासन यांचे मोठे योगदान आहे. जवळपास 60 वर्षे ते सिनेसृष्टीत काम करत आहेत. दक्षिण सिनेसृष्टीत त्यांचे विशेष योगदान आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, इप्लांट काढून टाकण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागणार आहे. कमल हासन ये उद्या म्हणजे 22 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल होतील. तसेच, पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी ते आपल्या व्यग्र कामकाजातून काही काळासाठी विश्रांतीही घेणार आहेत.

कमल हासन यांचा राजकीय पक्ष मक्कल निधि मय्यम द्वारे ही माहिती देण्यात आली आहे. मक्कल निधि मय्यम पक्षने म्हटले आहे की, कमल हासन यांना 22 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात येईल. तसेच, ते काही काळ विश्रांतीही घेतील. चित्रपट आणि इतर व्यग्र कामकाजामुळे इंप्लांट रिमूवल पुढे ढकलण्यात आले होते. मात्र, आता वेळ काढून त्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. (हेही वाचा, नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी: कमल हासन)

मक्कल निधि मय्यम  ट्विट

एका मुलाखती दरम्यान कमल हासन यांनी म्हटले होते की, ती घटना माझ्यासाठी प्रचंड वेदनादाई होती. अपघातानंतर माझ्या शरीरातून प्रचंड रक्त बाहेर येत होते. हा रस्कस्त्राव कायम राहिला असता तर त्यात कदाचित माझा मृत्यूही झाला असता. पण, माझे निशिब बलवत्तर होते. त्यामुळे त्या वेळी माझ्या कार्यालयात माझा स्टाफ उपलब्ध होता.

कमल हासन यांच्या कामकाजावर नजर टाकता ते सध्या 2 चित्रपटांमध्ये व्यग्र आहेत. त्यापैकी एक चित्रपट हा 1996 मध्ये आलेल्या चित्रपटाचा सीक्वल आहे. हा चित्रपट एस शंकर दिग्दर्शीत करत आहेत. शंकर यांनी या आधी रजनिकांत यांच्या चित्रपटासाठीही दिग्दर्शनही केले आहे. कमल हासन यांनी या चित्रपटाचा नुकताच एक फर्स्ट लूकही सोशल मीडियावर शेअर केला होता. कमल हासन आणि काजल यांच्याशिवाय या चित्रपटात सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंह, विवेक, प्रिया भवानी शंकर यांसारखे अनेक अभिनेतेही पडद्यावर दिसणार आहेत.