देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहेत. तर हातावर पोट असणाऱ्या स्थलांतरित कामगार आणि मजूरांना लॉकडाउनच्या काळात फटका बसला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून उत्पादनाचे कोणतेच साधन नसल्याने त्यांनी आपल्या घरी जाण्याची वाट पकडली आहे. कामगार मिळेल त्या मार्गाने जीवघेणा प्रवास करत असल्याचे दिसून येत आहेत. याच दरम्यान, अभिनेता सोन सूद स्थलांतरित कामगरांच्या मदतीला धावून आला आहे. सोनू सध्या स्थलांतरित कामगारांना आपल्या घरी पोहचता यावे यासाठी बसची व्यवस्था करत आहेत. त्याचा या कामाचे महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील यांनी कौतुक केले आहे.
सोनू याने यापूर्वी पीपीई किट्सची सुद्धा मदत केल्याचे समोर आले होते. त्याचसोबत सोनूने त्याचे आलिशान हॉटेल आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खुले करुन दिले आहे. सोनूकडून स्थलांतरित कामगारांना करण्यात येणाऱ्या मदतीचे कौतुक केले जात आहे. तसेच सोनूने स्थलांकरित मजुरांच्या प्रवासाचीचं नाही तर त्यांच्या जेवणाचीदेखील सोय केली आहे. सोनू सूद ने यापूर्वी कोरोना व्हायरसचे संक्रमण थांबवण्यासाठी प्लास्टिक फाईलपासून मास्क कशा पद्धतीने बनवला जातो, याचा व्हिडिओ शेअर केला होता.(जोपर्यंत शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचत नाही, तोपर्यंत मदत थांबणार नाही - सोनु सूद)
Maharashtra minister and NCP leader Jayant Patil praises Bollywood actor Sonu Sood for arranging buses for migrant workers desirous of returning to their homes
— Press Trust of India (@PTI_News) May 23, 2020
दरम्यान, कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी सर्व स्तरातून मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे. देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 125101 वर पोहचला असून 3720 जणांचा बळी गेला आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच नागरिकांना सुद्धा कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाउनच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे वांरवार सांगण्यात येत आहे. देशातील डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांवर अहोरात्र उपचार करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा एखा सुजाण व्यक्तीसारखे वागावे अशी अपेक्षा करण्यात येत आहे.