मुंबई येथून उत्तर प्रदेशात परतलेल्या स्थलांतरित कामगाराची राहत्या घरी आत्महत्या
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या स्थलांतरित कामगार आणि मजूर वर्गाचे हाल होत आहेत. तसेच गेल्या दीड महिन्यापेक्षा अधिक काळ लॉकडाउन कायम असल्याने कोणतेच उत्पादनाचे साधन नसल्याने या कामगार वर्गाने आपल्या घरची वाट पकडली आहे. तर सरकारने स्थलांतरितांसाठी स्पेशल ट्रेन सुरु केल्या आहेत. याच दरम्यान, आता मुंबईतून उत्तर प्रदेशात परतलेल्या एका स्थलांतरित कामगारने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

कामगार आणि मजूर वर्ग मिळेल त्या मार्गाने आपल्या जिल्ह्यात पोहचण्यासाठी जीवघेणा प्रवास करताना दिसून येत आहेत. तर उत्तर प्रदेशातील बांधा जिल्ह्यात राहत असलेल्या एक स्थलांतरित कामगार मुंबईहून आपल्या घरी आला होता. त्याला होम क्वारंटाइन करण्यात आले असता त्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. परंतु कामगारने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.(Coronavirus in India: देशात 5 राज्यांत सुमारे 80 टक्के कोरोना व्हायरस प्रकरणे; Doubling Rate झाला 13.3 दिवस, Recovery Rate 40 टक्क्यांपेक्षा जास्त)

दरम्यान, देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 125101 वर पोहचला असून 3720 जणांचा बळी गेला आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच नागरिकांना सुद्धा कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाउनच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे वांरवार सांगण्यात येत आहे. देशातील डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांवर अहोरात्र उपचार करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा एखा सुजाण व्यक्तीसारखे वागावे अशी अपेक्षा करण्यात येत आहे.